29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाभगव्या कफनीने केला त्यांचा घात

भगव्या कफनीने केला त्यांचा घात

Google News Follow

Related

पालघर येथील हिंदू सांधूंच्या हत्याकांडाला आज एक वर्ष झालेले आहे. गेल्या वर्षी महंत कल्पवृक्ष गिरी, महंत सुशिल गिरी आणि त्यांचा चालक निलेश तेलगडे यांची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येला एक वर्ष उलटले असले तरिही या साधूंना न्याय मिळाला नाहीये. या निमित्ताने ‘न्यूज डंका’ ने या घटनेच्या सत्यशोधन समितीतील सहसचिव असलेल्या ॲड. प्रवर्तक पाठक यांच्याशी विशेष बातचीत केली. त्यांनी या केसशी संबंधीत अनेक दुर्लक्षित झालेल्या बाबी समोर आणल्या. यावेळी त्यांनी सत्यशोधन समितीचा अहवाल, या प्रकरणाची न्यायालयीन स्थिती, पालघर जिल्ह्याचे सामाजिक वास्तव, या प्रकरणातील सरकारी अनास्था अशा अनेक विषयांवर भाष्य केले.

त्यांच्या सत्यशोधन समितीतच्या अहवालाविषयी बोलताना त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. या घटनेचा नीट तपास झाला नसल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. या भागात डाव्या विचारसरणीच्या अनेक संघटना कार्यरत असतात. त्यातल्या अनेकांना ख्रिश्चन मिशनरीज पैसा पुरवतात. ही गोष्ट इथेच थांबत नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना प्रतिनीधीत्व दिले जाते. या संघटनांच्या कामातून हिंदू विद्वेष पसरवला जातो. हिंदुत्ववादी संघटना, आश्रमशाळा यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत असेही त्यांनी सांगितले.

हा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही घटना अफवेतून घडल्याचे सांगितले पण त्यासंबंधीचे कोणतेही तपशील आढळत नाही. साधी एखादी तक्रारही दिसली नाही. पण मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकले की ही घटना कशामुळे घडली. सरकारला घटनेचे गांभीर्यच नव्हते. प्रकरणाचा तपास व्हायच्या आधीच निष्कर्ष काढण्यात आला होता असे ॲड. पाठक यांनी सांगितले.

या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही घटना घडली असताना बघ्याची भूमिका घेतली त्यांना या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार करण्यात आले. जे राजकीय पुढारी या घडल्या प्रकाराच्यावेळी जे राजकीय पुढारी उपस्थित होते. जे आल्यानंतर हा जमाव उत्तेजित झाला. त्यांनादेखील यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार करण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच सारवासारवी करण्याकडे पहिल्यापासूनच कल असल्याचे दिसून येते असे मत ॲड. प्रवर्तक पाठक यांनी मांडले

हे ही वाचा:

पालघर हत्याकांड:- एक वर्षानंतर

न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील’

नॅशनल हाऊसिंग बँकेच्या बोर्डावर सतीश मराठेंची नियुक्ती

रियाज काझीला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

या प्रकरणाच्या तपासातील त्रुटींवरही ॲड. पाठक यांनी भाष्य केले. या प्रकरणाचा तपास करताना अनेक बाबींकडे कानाडोळा करण्यात आला आहे. एकूण जमाव जरी ४००-४५० चा असला तरिही ज्यांनी त्या साधूंची हत्या केली असे काही ठराविकच होते. हे सगळे लोक तिथे कसे एकत्र जमले?? एवढ्या अल्पावधीत इतकी गर्दी कशी झाली?? आजूबाजूच्या चार गावांत संदेश पोहोचवून तिथे लोक जमवण्यासाठी काय यंत्रणा राबवली गेली? त्यांचे नेमके उद्दिष्ट काय होते? या सारख्या अनेक बाबींचा तपास करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात अजून उत्तम तपास होण्यासाठी सीबीआय किंवा एनआयए कडून तपास होणे गरजेचे आहे. कारण पालघर भागात पथ्थलगडी चळवळ सक्रीय आहे. ही चळवळ म्हणजे काही विशिष्ट विचारसरणीचे लोक आदिवासी भागात जाऊन तिथल्या लोकांना राज्यघटनेतील काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडून आम्ही भारतीय राज्य मानत नाही. आमचा भाग स्वतंत्र आहे आणि आमच्या पद्धतीने कारभार करू असे सांगितले जाते. शासकीय अधिकाऱ्यांना गावात येण्यापासून मज्जाव केला जातो. पालघरच्या काही गावांमध्ये असे फलक दिसून आले होते. या सगळ्याचा थेट संबंध हा नक्षल चळवळीशी आहे. त्यामुळे ही पालघरमध्ये नक्षलवादाची सुरूवात नाही ना? असा प्रश्न प्रवर्तक पाठक यांनी उपस्थित केला आहे.

त्या सांधूंची हत्या केवळ आणि केवळ ते भगवाधारी असल्यामुळे झाले असा दावा ॲड. प्रवर्तक पाठक यांनी केला. ते जर सामान्य माणसाच्या वेषात असते तर त्यांच्यावर हल्ला झाला नसता. त्यांनी फक्त आणि फक्त भगवी कफनी घातली होती म्हणूनच त्यांना मारण्यात आले असे म्हणताना ही घटना हिंदू विद्वेषातून झाल्याची मांडणी ॲड. प्रवर्तक पाठक यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा