पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी(१७ एप्रिल) लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर अनेक आरोप केले असून धमकीही दिली आहे.इम्रान खान म्हणाले की, पत्नीला तुरुंगात पाठवण्यामागे असीम मुनीर यांचा सहभाग आहे.माझ्या पत्नीला जर काही झाले तर मी असीम मुनीर यांना सोडणार नाही, जोपर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत असीम मुनीर यांना सोडणार नाही.
इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना मागील काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली.भ्रष्टाचार प्रकरणी आणि इम्रान खान यांच्यासोबत बेकायदेशीर विवाह केल्याप्रकरणी दोषी ठरवत त्यांना अटक करण्यात आली होती.सध्या त्यांच्या इस्लामाबाद येथील बनी गाला येथील निवासस्थानी त्यांना निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.दरम्यान, बुशरा बीबी यांच्या तुरुंगवासाला लष्कर प्रमुख जबाबदार असल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘मुर्शिदाबाद हिंसाचाराची एनआयए चौकशी करा’!
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर!
रवी किशनची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेविरुद्ध पत्नी प्रीती शुक्ला यांची तक्रार!
२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!
अडियाला तुरुंगात कैद असणाऱ्या इमरान खान यांनी पत्रकारांसोबत बोलताना लष्कर प्रमुखांवर अनेक आरोप केले.याबाबत त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट अपलोड करण्यात आली. पोस्टमध्ये म्हटले आहे की, पत्नीला झालेल्या शिक्षेत जनरल असीम मुनीर यांचा थेट सहभाग आहे.माझ्या पत्नीला काहीही झाले तरी मी असीम मुनीरला सोडणार नाही, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी असीम मुनीरला सोडणार नाही. मी त्यांच्या असंवैधानिक आणि बेकायदेशीर पाऊलांचा पर्दाफाश करून टाकेन.
खान पुढे म्हणाले की, देशात जंगलराज आहे आणि सर्व काही “जंगलाचा राजा” करत आहे. पीटीआयला पोटनिवडणूक लढवण्यापासून रोखले जात असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, या गंभीर आरोपांवर लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.