बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सलमान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. यानंतर आता कारवाई दरम्यान पोलिसांनी आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. बुधवारी मुंबई विमानतळावर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तुषार काळे, सचिन पोटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सलमान खान याच्या मुंबईतील घरावर गोळीबार झाला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय होता. यापूर्वीही सलमान खान याला त्याच्या गँगकडून धमक्या मिळाल्या होत्या. अखेर तपासादरम्यान, सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आता या दोन आरोपींना मदत करणाऱ्या दोन संशयितांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी पोलिसांनी गुजरातमधून गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या पार्श्भूमीवर या दोघांना आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंबाहेर रविवारी दोन जणांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी दोन आरोपींना सोमवारी रात्री गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली होती. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी दोघा आरोपीची नावे आहेत. मुंबई पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केले असता, दोघांनाही २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विकी गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल मूळचे बिहारमधील पश्चिम चंपारणचे रहिवासी आहे. सागर पाल हा बाईक चालवत होता तर मागे बसलेल्या विकी गुप्ताने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. हे दोघेही दोन वर्षांपासून बिश्नोई गँगसाठी काम करत होते.
हे ही वाचा:
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर!
२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!
रवी किशनची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेविरुद्ध पत्नी प्रीती शुक्ला यांची तक्रार!
आरोपींनी घटनेपूर्वी तीन वेळा सलमान खानच्या घराची रेकी केली होती. दोन्ही गोळीबार करणाऱ्यांनी पाच राऊंड फायर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारानंतर अनमोल बिश्नोई याने या घटनेबाबत फेसबुकवर एक पोस्टही लिहिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनमोल बिश्नोई हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल याच्या सांगण्यावरून राजस्थानचा गँगस्टर रोहित गोदारा याने सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचे काम या दोघांना दिले होते.