रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा अखेर सुटला आहे.भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.भाजपने आज १३ वी यादी जाहीर केली.या यादीमध्ये महाराष्ट्रातून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सावंत हे इच्छुक होते.मात्र, या जागेसाठी नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, आमच्यात कोणताही वाद नसून नारायण राणे यांचा अर्ज भरताना आम्ही त्यांच्यासोबत राहू , असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
हे ही वाचा:
२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!
रवी किशनची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेविरुद्ध पत्नी प्रीती शुक्ला यांची तक्रार!
भाजपाशासित राज्यांमधून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधी संकोच का करतायत?
दरम्यान, या जागेसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची देखील चर्चा होती.आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासोबत होणार आहे.