दिल्लीने बुधवारी गुजरातचा सहा विकेटने पराभव केला. आयपीएल २०२४ हंगामातील हा सर्वांत छोटा सामना ठरला. तर, दिल्लीचा आयपीएलमधील सर्वांत मोठा विजय. दिल्लीने ६७ चेंडू राखून गुजरातवर मात केली. याआधी पंजाबच्या विरुद्ध दिल्लीने ५७ चेंडू राखून विजय मिळवला होता. आयपीएलमध्ये चेंडूंच्या बाबतीत बोलायचे तर, दिल्लीचा हा सातवा सर्वांत मोठा विजय आहे.
याआधी दिल्लीने सन २०१२मध्ये चेन्नईच्या विरुद्ध ४० चेंडू राखून विजय मिळवला होता. तर, डेक्कन चार्जर्सविरोधात सन २००८मध्ये संघाने ४२ चेंडू राखून विजय मिळवला होता. २० षटकांच्या खेळात ९० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य सर्वांत कमी षटकांत कोलकात्याने साध्य केले होते. सन २०११मध्ये इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध ९८ धावांचे लक्ष्य केवळ ७.२ षटकांत साध्य केले होते.
हे ही वाचा:
रामनवमीच्या दिवशी ‘जय श्री रामा’चा नारा दिल्याने बेंगळुरूमध्ये तीन जणांवर प्राणघातक हल्ला
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून बिहारी कामगाराची गोळ्या झाडून हत्या
बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी; अनेक जखमी
२०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास अन २०२४ मध्ये मोदींची ‘गँरंटी’
दिल्लीने चेंडू राखून मिळवलेला सर्वांत मोठा विजय
६७ विरुद्ध गुजरात, अहमदाबाद, २०२४
५७ विरुद्ध पंजाब, मुंबई बीएस, २०२२
४२ विरुद्ध डेक्कन चार्जर्स, हैदराबाद, २००८
४० विरुद्ध चेन्नई, दिल्ली २०१२
सर्वांत कमी षटकांत आयपीएलमध्ये ९० किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग
७.२ – कोलकाता विरुद्ध राजस्थान, इंदोर, २०११ (९८)
८.२ – मुंबई विरुद्ध राजस्थान, शारजा, २०२१ (९१)
८.५ – डेक्कन चार्जर्स विरुद्ध गुजरात, अहमदाबाद २०२४ (९०)
१० – कोलकाता विरुद्ध बंगलुरू, अबूधाबी, २०२१ (९३)
आयपीएलमध्ये चेंडू राखीव ठेवून मिळवलेला सर्वांत मोठा विजय
८७ – मुंबई विरुद्ध कोलकाता, २००८
७६ – कोलकाता विरुद्ध राजस्थान, २०११
७३ – पंजाब विरुद्ध दिल्ली, २०१७
७२ – हैदराबाद विरुद्ध बेंगळुरू, २०२२
७१ – बेंगळुरू विरुद्ध पंजाब, २०१८
७० – मुंबई विरुद्ध राजस्थान, २०२१
६७ – दिल्ली विरुद्ध गुजरात, २०२४