पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांना निवडणूक आयोगाने १८ आणि १९ एप्रिल रोजी कूचबिहारचा दौरा रद्द करण्याचा सल्ला दिला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी या मतदारसंघात मतदान होणार असून हा दौरा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.या संदर्भांत निवडणूक आयोगाने राज्यपालांच्या कार्यालयाला पत्र पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस हे १८-१९ एप्रिल दरम्यान कूचबिहारला भेट देणार होते.तत्पूर्वी राज्यपालांच्या दौऱ्याची माहिती मिळताच निवडणूक आयोगाने त्यांना दौरा रद्द करण्याचा सल्ला दिला कारण हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
टी-२० विश्वचषकात रोहित-विराट करणार सलामीला
राहुल गांधी अन प्रियंका हे ‘अमूल बेबीज’!
महेश मांजरेकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट का सोडला?
हेमा मालिनी यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस खासदाराला दोन दिवस प्रचार करण्यास मज्जाव!
निवडणूक आयोगाकडून राज्यपालांना तसे पत्र पाठवण्यात आले आहे.निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे की, त्यांचा हा कूचबिहारचा दौरा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा आहे.त्यामुळे राज्यपालांनी कूचबिहारचा प्रस्थावित दौरा थांबवावा.दरम्यान, लोकसभेसाठी येथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.मतदानापूर्वी ४८ तासांचा शांततेचा कालावधी बुधवारी संध्याकाळपासून सुरू झाला आहे.या कालावधीत राजकीय पक्षांना मतदानाच्या तारखेपूर्वी प्रचार करण्यास मनाई असते.
निवडणूक आयोगाने पुढे पत्रात म्हटले आहे की, आदर्श आचारसंहिता (MCC) अंतर्गत राज्यपाल कोणतेही स्थानिक कार्यक्रम आयोजित करू शकत नाहीत.तसेच १८ आणि १९ एप्रिल दरम्यान संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल निवडणूक व्यवस्थापनामध्ये व्यस्त असेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.