28 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरसंपादकीयएकनाथ शिंदे यांच्या ‘करंट’वर शिक्कामोर्तब करणारा सर्व्हे

एकनाथ शिंदे यांच्या ‘करंट’वर शिक्कामोर्तब करणारा सर्व्हे

एकनाथ शिंदे यांचा तळागाळात करंट नाही, ही बाबही या सर्व्हेमुळे उताणी पडली

Google News Follow

Related

विविध वृत्तवाहिन्यांचे सर्व्हे हा एक मोठा जुगाड असतो. सी-व्होटरच्या सर्व्हेने ही बाब आता पुरेशी स्पष्ट केलेली आहे. ताज्या सर्व्हेमध्ये महायुतीला ३० आणि मविआला १८ जागा बहाल केल्या आहेत. वर्षभरापूर्वी हा आकडा नेमका उलट होता. ताज्या सर्व्हेचे आकडे मान्य केले तर महाराष्ट्राने एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वीकारल्याचे चित्र दिसते आहे.

निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आल्यावर कोणाची ताकद किती याची चाचपणी मतदारांपासून माध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत सगळेच आपआपल्या परीने करत असतात. आपण ज्या पक्षाचा विचार मानतो तो किती शक्तीशाली आहे किंवा कमकुवत आहे, हे जाणून घेण्याचा मतदारांचा प्रयत्न असतो. त्याची जिज्ञासा भागवण्याचे काम सर्व्हे करणाऱ्या कंपन्या करत असतात. या कंपन्यांच्या विश्वासार्हतेबाबत मात्र मोठे प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांच्या मनात असते. त्याची ठोस कारणेही आहेत.

सी व्होटरने २८ जानेवारी २०२३ मध्ये जाहीर केलेल्या सर्व्हेतल्या आकड्यांमध्ये केवळ तफावत नाही तर हे आकडे अगदी उलटे-पालटे झाले आहेत. त्यावेळच्या परीस्थितीत आणि आताच्या राजकीय परिस्थितीत बदल झालेला आहे हे निश्चित, परंतु त्यावेळीही हे आकडे मविआकडे झुकलेले वाटत होते. मविआची राजकीय ताकद संपल्यानंतरही त्यांना जास्त जागा बहाल करण्यात येत होत्या. ठिक सव्वा वर्षापूर्वी जाहीर झालेल्या या आकड्यांमध्ये महाविकास आघाडीला भरीव यश मिळणार असा दावा करण्यात आला होता. महायुतीला फक्त १४ जागा मिळणार असे भाकीत करण्यात आले होते. मविआला मात्र ३४ जागा बहाल करण्यात आल्या होत्या.

काल जाहीर झालेल्या सर्व्हेत या आकड्यांची अदलाबदल झालेली दिसते. महायुतीला ३० तर मविआला १८ जागा मिळणार आहेत. तरीही दोन्ही सर्व्हेचा मथळा मात्र तोच मविआला भरघोस यश. ताज्या सर्व्हेमध्ये उबाठा शिवसेनेना ९ जागा तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ९ ते १० जागा मिळणार असल्याचे भाकीत केले आहे. जसेच्या तसे प्रत्यक्षात येण्याची शक्यता अजूनही कमी वाटते, परंतु समजा हेच आकडे खरे ठरले तर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा विजय मानला पाहिजे. कारण एकनाथ शिंदे हे ठाकरेंपासून अगल झाल्यानंतर असा सातत्याने प्रचार करण्यात येत होता की जनता आणि कार्यकर्ते अजूनही ठाकरे यांच्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे यांचा खाली अजिबातच करंट नाही. सर्व्हेचे आकडे सत्य मानले तर ही बाब खोटी ठरते.

एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा जास्त जागा लढवून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कमी जागा मिळणार असल्याचे हा सर्व्हे सांगतो. शिवाय मुंबईतून ठाकरे यांचा पक्ष साफ होणार असेही भाकीत या सर्व्हेत करण्यात आले आहे, जे ठाकरेंसाठी धक्कादायक आहे. शिवसेना फुटल्यापासून उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती असल्याचे सांगितले जाते. लोकांच्या मनात या घटनेबाबत प्रचंड राग असून त्याचा फटका एकनाथ शिंदेना बसेल असाही दावा करण्यात येत होता. प्रत्यक्षात हा दावा मराठी मीडियाने पसरवलेला भ्रम आहे, हे या सर्व्हेने सिद्ध झाले आहे. एकनाथ शिंदे यांना लोकांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीच स्वीकराले नसून जनतेने आणि मतदारांनीही त्यांना स्वीकारले असल्याचे हा सर्व्हे सांगतो.

हे ही वाचा:

टी-२० विश्वचषकात रोहित-विराट करणार सलामीला

राहुल गांधी अन प्रियंका हे ‘अमूल बेबीज’!

महेश मांजरेकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट का सोडला?

हेमा मालिनी यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस खासदाराला दोन दिवस प्रचार करण्यास मज्जाव!

एकनाथ शिंदे यांचा तळागाळात करंट नाही, ही बाबही या सर्व्हेमुळे उताणी पडली आहे. शिवसेना फोफावली मुंबई आणि ठाण्यातून. मुंबई महानगर पालिका हा सुरूवातीच्या काळात शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा आर्थिक स्त्रोत राहिलेला आहे. त्या मुंबईत उबाठा शिवसेनेचा एकही खासदार जिंकून येणार नाही, असा दावा या सर्व्हेत करण्यात आलेला आहे. ही बाब ठाकरेंची झोप उडवणारी आहे.

या सर्व्हेत उबाठा शिवसेनेला ९ जागा मिळणार असे जाहीर केलेले असले तरी प्रत्यक्षात एवढ्या जागा मिळतील याची शक्यता कमी आहे. या जागा मिळाल्यास त्याचा अर्थ एवढाच की मुस्लीम मतदारांची मतपेढी पक्षाकडे वळवण्यात ठाकरेंना यश आलेले आहे. परंतु तरीही त्यांच्या जागा निम्म्याने कमी झालेल्या आहेत. अजित पवार यांच्यासाठी मात्र हा सर्व्हे धक्कादायक ठरण्याची शक्यता आहे. कारण त्यांना जागा वाटपात ५ जागा मिळालेल्या आहेत. त्यापैकी बारामती आणि शिरुरसह एकही जागा त्यांच्या वाट्याला येणार नाही, असा दावा या सर्व्हेत करण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा की बारामतीची गढी वाचवण्यात शरद पवार यांना यश मिळण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या दोन जागा कमी होणार, ही बाब सुद्धा खटकणारी आहे. मविआतील दोन पक्षांची ताकद प्रचंड घटल्यानंतर मविआच्या जागा वाढणार हे न पटणारे आहे. गेल्या सव्वा वर्षात ज्या प्रकारे सी-व्होटरचे आकडे बदलत आहेत हे लक्षात घेता, आणखी पंधरा दिवसांनी हा आकडा महायुतीने जाहीर केलेल्या आकड्याच्या जवळपास म्हणजे ४० पार होण्याची दाट शक्यता आहे. एक्झिट पोलमध्ये कदाचित महायुतीतर्फे कऱण्यात येणारा दावा आणि सी व्होटरचे आकडे जुळण्याची शक्यता आहे. कारण आता तर कुठे पिक्चर सुरू झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आता कुठे महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे आता कुठे सुरू झालेले आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा