28 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषकोलकात्याच्या सुनील नारायणची राजस्थानविरुद्ध दमदार खेळी

कोलकात्याच्या सुनील नारायणची राजस्थानविरुद्ध दमदार खेळी

Google News Follow

Related

कोलकात्याचा सलामीवीर सुनील नारायण हा मंगळवारी रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन यांच्या पंक्तीत जाऊन बसला. त्याने राजस्थानच्या गोलंदाजांची पिसे काढली अन् कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर बहुप्रतीक्षीत असे टी२० शतक झळकवले.

नारायण याने ५०४व्या गेममध्ये टी२०चे पहिलेवहिले शतक झळकवले. त्याने अवघ्या ४९ चेंडूंत ही कामगिरी केली. राजस्थान आणि कोलकात्यादरम्यान झालेल्या या सामन्यात नारायण हा आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा आणि शतक
ठोकणारा तिसरा खेळाडू ठरला. नारायणने सन २०१३च्या आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेतली होती. तेव्हा कोलकात्याच्या या गोलंदाजाने पंजाबच्या डेव्हिड हसी, अझर मेहमूद आणि गुरकीरत सिंग यांना बाद केले होते.

नारायण याने सहा षटकार आणि १३ चौकार लगावल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर कोलकात्याला २० षटकांत सहा बाद २२३ धावा करता आल्या. नारायण याने ५६ चेंडूंत १०९ धावा केल्या. नारायण हा ब्रेंडन मॅकक्लम आणि वेंगटेश अय्यर यांच्यानंतर शतक ठोकणारा कोलकात्याचा तिसरा फलंदाज ठरला.

हे ही वाचा:

विहिंप नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन दहशतवाद्यांना अटक

शाळेत नमाज पढू द्या म्हणून लंडनमध्ये विद्यार्थीनीची याचिका, न्यायालयाने खडसावले!

ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत नऊहून अधिक राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ होणार

रामनवमी: रावणाच्या अत्याचारातून मुक्तीसाठी भगवान विष्णूंचा सातवा अवतार

राजस्थानचा माजी अष्टपैलू खेळाडू याने आयपीएलच्या २०१४च्या हंगामात हॅटट्रिक केली होती. तेव्हा त्याने शिखर धवन, मोइझेस हॅनरिक्स आणि कर्ण शर्मा यांना बाद केले होते. वॅटसन याने आयपीएलमध्ये खेळताना चार शतके ठोकली आहेत. वॅटसन हा सन २०१८मध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला होता. तर, भारताच्या रोहित शर्माने शतक ठोकून हॅटट्रिकही केली होती. रोहितने सन २००९मध्ये हॅटट्रिक केली होती. रोहितने अभिषेक नायर आणि हरभजनसिंग यांना बाद केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा