भारतामध्ये नुकतेच आगमन करत असलेल्या इलेक्ट्रीक वाहने बनवण्यात अग्रणी कंपनी असलेल्या टेस्लाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरात लवकर भारतातच उत्पादन सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.
रायसिना डायलॉग या कार्यक्रमात एका सत्रात बोलताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी हे मत व्यक्त केले होते.
हे ही वाचा:
जिलेटिनची कांडी आणि ऑक्सिजनची नळकांडी
रियाज काझीला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
वॉर रूमची कार्यक्षमता मुख्यमंत्र्यांसारखीच अद्भुत
लस उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवावेत
मी त्यांना (टेस्लाला) सुचवू इच्छितो की ही भारतातच उत्पादन सुरू करण्याची सुवर्णसंधी आहे, कारण गाडीतील घटकांचा विचार केला तर, टेस्ला सध्या त्यांच्या गाड्यांसाठी अनेक भारतीय घटकांचा वापर करते. त्यामुळे गाडीचे उत्पादन भारतात करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल. त्यामुळे टेस्लाच्या फायद्यासाठीच मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर भारतातच उत्पादन सुरू करा.
असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
त्याबरोबरच मंत्री महोदयांनी असा विश्वास देखील व्यक्त केला की सध्या भारतीय उत्पादक ज्या इलेक्ट्रिक गाड्या निर्माण करतात, त्या लवकरच टेस्लाच्या तोडीच्या असतील. नितीन गडकरी यांनी टेस्ला भारतातून निर्यात देखील करू शकेल असेही त्यांनी सुचवले.
भारताने या अर्थसंकल्पात व्हेहिकल स्क्रॅपेज पॉलिसी स्वीकारली आहे. या धोरणांतर्गत ठराविक वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना भंगारात काढणे भाग आहे. गडकरी यांनी या वाहनांतून पुनर्वापरायोग्य स्टील आणि रबर उपलब्ध होऊन, उत्पादन खर्चात घट होण्याबद्दलचा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
त्याशिवाय इथॅनॉलचा पर्यायी इंधन म्हणून वापर, इलेक्ट्रिक वाहनांचा सरकारी वापर अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या विषयांवर देखील त्यांनी मत व्यक्त केले.