नंगलमध्ये १२ एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषदेच्या नंगल विभागाचे अध्यक्ष विकास प्रभाकर बग्गा यांची हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेच्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी ७२ तासांच्या आत या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. लवकरच याबाबत अधिक माहिती मिळवली जाईल. पोलिसांनी या दोन आरोपींना कुठून अटक केली, हेदेखील अद्याप सांगितलेले नाही.
पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी या संदर्भात ‘एक्स’वर माहिती दिली. पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांची नावे मनदीपकुमार उर्फ मंगी आणि सुरेंद्र कुमार उर्फ रिक्का अशी आहेत. त्यांच्याकडून .३२ बोरची दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. त्यातील एका पिस्तुलाने बग्गा यांची हत्या करण्यात आली होती. तसेच, त्यांच्याकडून १६ जिवंत काडतुसे आणि एक रिकामे काडतूस जप्त करण्यात आले. हे दोघेही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते, अशी माहिती पोलिस महासंचालकांनी दिली. या दोघांना पैशांच्या आमिषाने संघटनेत सहभागी करून घेण्यात आले होते.
हे ही वाचा:
शाळेत नमाज पढू द्या म्हणून लंडनमध्ये विद्यार्थीनीची याचिका, न्यायालयाने खडसावले!
ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत नऊहून अधिक राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ होणार
रामनवमी: रावणाच्या अत्याचारातून मुक्तीसाठी भगवान विष्णूंचा सातवा अवतार
ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक
गेल्या शनिवारी संध्याकाळी नंगलच्या रेल्वे रस्त्यावरील विहिंपच्या नंगल मंडळाचे प्रधान विकास प्रभाकर उर्फ विकास बग्गा यांच्या दुकानावर दोघा हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. या हल्लेखोरांपैकी एकाने हेल्मेट परिधान केले होते. तर, दुसऱ्याने मफलरने चेहरा झाकला होता. दोघेही काळ्या रंगाच्या स्कूटरवरून आले होते. हल्लेखोरांची माहिती देण्यासाठी एक लाख रुपयाचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या साह्याने पोलिसांनी या हल्लेखोरांचा माग काढला.