25 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामासलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊसची देखील केली गेली होती रेकी

सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊसची देखील केली गेली होती रेकी

पनवेलमध्ये खोली भाड्याने देणाऱ्या मालक आणि एजंटला पोलिसांनी घेतले ताब्यात

Google News Follow

Related

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना क्राईम ब्रांचने गुजरातच्या भुज येथून अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती क्राईम ब्रांचचे सह-पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिली.

अटक केलेल्यामध्ये विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांचा समावेश आहे. हे दोघे लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रविवारी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील गॅलक्सि आपर्टमेंट या निवसस्थानाबाहेर मोटारसायकलच्या मागे बसलेल्या व्यक्तीने पाच राउंड गोळीबार केले. यातील एक गोळी घरात घुसली तर दुसरी भिंतीला लागली. त्यानंतर या दोघांनी पळ काढला.

 

घटनेची माहिती समजताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून गुन्हा दाखल केला. तर याचा समांतर तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार क्राईम ब्रांचने १२ पथके तयार केली. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या दोघांनी माउंटमेरी येथे दुचाकी सोडून पळ काढल्याची माहिती लखमी गौतम यांनी दिली. यादरम्यान, क्राईम ब्रांचची काही पथके, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, हरियाणा या ठिकाणी रवाना केली.

अशातच पोलीस खबरी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता, हे दोन्ही मारेकरी गुजरातमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून क्राईम ब्रांचच्या युनिट ११ चे पोलीस निरीक्षक भरत घोणे आणि सीआययूचे थोरात यांची पथके गुजरातला रवाना केली. यादरम्यान हे दोन्ही मारेकरी भुज येथे असल्याचे समजले. मात्र हे दोन्ही आरोपीकडे शस्त्र असल्याने ते गोळीबार करण्याची शक्यता होती. तसेच हा परिसर परिचयाचा नसल्याने भुज येथील पोलीस अधीक्षकांकडे मदत मगितल्याची माहिती लखमी गौतम यांनी दिली. त्यानुसार, भुज पासून ७ किलोमीटरवर असलेल्या रकतराणा परिसरात गुजरात पोलीसांची कुमक येताच येथून ४० किलोमीटर दूरवर असलेल्या दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली.

हे ही वाचा:

भाजपाच्या जाहीरनाम्यात गरिबांसाठीची गृहनिर्माण योजना नाही, तृणमूलच्या साकेत गोखलेंचा खोटा दावा

अमेरिकेत हिंदूंवरील हल्ल्यांबद्दल भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता!

दिनेश कार्तिक बनणार टीम इंडियाचा फिनिशर?

आयरिश टाइम्सने मोदींबद्दल केलेल्या खोडसाळपणाला भारताचे उत्तर

तापी नदीत फेकून दिले रिव्हॉल्व्हर

दरम्यान, सलमान खानच्या निवसस्थानाबाहेर गोळीबार केल्यानंतर या दोन्ही आरोपीनी गुजरात गाठले. या ठिकाणी येताच तापी नदीत गोळीबार केलेले रिव्हॉल्व्हर आरोपीनी फेकून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. नदीत पाणी असल्याने रिव्हॉल्व्हरचा शोध लागणे सध्या कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पनवेलमधून दुचाकी घेतली होती विकत

या दोन्ही आरोपीनी पनवेल येथून दुचाकी विकत घेतल्याचे तपासातून समोर आले. त्यानुसार पोलिसांनी मोटरसायकलच्या मालकाचा शोध घेत त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या दोघांना ओळखले.

सलमानच्या फार्महाऊसजवळ भाड्याने घेतले घर

सलमान खान हा केव्हातरी पनवेल येथील फार्महाऊसवर राहण्यासाठी येत असल्याची माहिती या हल्लेखोरांना होती. त्यानुसार या हल्लेखोरांनी येथून १२ किलोमीटरवर असलेल्या पनवेलमधील हरिग्राम गावातील राधाकृष्ण अपार्टमेंट मधील बी-विंग मध्ये राहुल किसन भोपी यांच्या रुममध्ये मागील एक ते दीड महिन्यापासून घर भाड्याने घेतले होते. त्यामुळं मागील एक ते दिड महिन्यांपासून त्यांनी या गोळीबाराची तयारी केल्याचंही समोर आले आहे. मुंबई क्राईम ब्रँचनं मोटारसायकल मालक व घर मालक या दोघांना या गुह्यातील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

दुचाकीवरून करीत होते प्रवास

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या नजरेत येऊ नये, यासाठी हल्लेखोरांनी पनवेल येथे भाड्याने घर घेतले. तेथून दुचाकीवर ते सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाची रेकी करण्यासाठी येत होते. तर कधी पनवेल येथील सलमान खानच्या फार्महाऊसची रेकी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा