29 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरदेश दुनियाविजय माल्या, नीरव मोदी यांना लवकरच भारतात आणणार

विजय माल्या, नीरव मोदी यांना लवकरच भारतात आणणार

ब्रिटनच्या सरकारने केली सीबीआय अधिकाऱ्यांशी चर्चा

Google News Follow

Related

किंगफिशर एअरलाइन्सचे माजी प्रवर्तक फरार विजय मल्या, हिरे व्यावसायिक नीरव मोदी आणि शस्त्रास्त्रांचे व्यापारी संजय भंडारी यांच्यासह पंजाबचे फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांप्रति सहानुभुती दाखवणाऱ्यांची भारतात पाठवणी होऊ शकते. म्हणजेच त्यांचे प्रत्यार्पण होऊ शकते. सध्या भारताचे अनेक फरार ब्रिटनमध्ये असून केंद्रीय तपास संस्था त्यांच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी भारत आणि ब्रिटनने कायदा सहकार्य करारांतर्गत कारवाईत वेग आणण्याचा आणि फरारांशी संबंधित प्रत्यार्पणा विनंतीना प्राथमिकता देण्याच्या आवश्यकतेवर सोमवारी चर्चा केली.

ब्रिटनच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाने सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मुख्यालयाच्या दौऱ्यादरम्यान या मुद्द्यांवर चर्चा केली. या प्रतिनिधीमंडळात इंटरपोलच्या महासचिवच्या पदासाठी ब्रिटनचे उमेदवार स्टीफन कवानाघ हेदेखील सहभागी होते. सीबाआय संचालक प्रवीण सूद आणि सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ब्रिटनसोबत संचालनात्मक सहकार्य वाढवण्यासाठी कवानाघ यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

दोन्ही पक्षांनी गुन्हेगारीविषयक गुप्त माहिती देणे आणि अर्थविषयक गुन्हेगार, संघटित गुन्हेगारी, दहशतवाद, सायबर गुन्हे आणि अन्य आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा निपटारा करण्यासह अन्य मुद्द्यांवरही चर्चा केली. दोन्ही पक्षांनी इंटरपोल माध्यमांसह समन्वय आणि प्रभावी उपायांसह जागतिक गुन्हेगारीशी लढण्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली. हा दौरा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखण्यासाठी ब्रिटन आणि भारतामधील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास सीबीआयने व्यक्त केला.

हे ही वाचा:

ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक

‘स्वतः आंबेडकरही भारताचे संविधान बदलू शकत नाहीत’!

मुंबईत झाडांवरील रोषणाईच्या माळा काढण्यास सुरुवात!

झेलम नदीत बोट उलटली; विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता

‘द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, परस्पर कायदेविषयक मदतीला वेग आणणे, आणि फरारांशी संबंधित प्रत्यार्पण विनंत्यांना प्राधान्य देण्याच्या आवश्यकतेसह सुरक्षेसंदर्भातील आव्हानांना प्रभावीपणे दूर करण्यासाठी एकजुटीने काम करण्याच्या बाबीवर जोर देण्यात आला,’ असे तपास संस्थेने दिलेल्या निवेदनात जाहीर केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा