24 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषसरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याच्या हत्येप्रकरणी पाककडून भारतावरच आरोप!

सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याच्या हत्येप्रकरणी पाककडून भारतावरच आरोप!

तांबा अजून जिवंत, पाकिस्तानचा दावा

Google News Follow

Related

पाकिस्तानने सरबजीत सिंग यांचा मारेकरी सरफराज तांबा याच्या हत्येचा आरोप भारतावरच केला आहे. पाकिस्तानमधील चार हत्यांमध्ये भारताचा सहभाग असल्याचा संशय आहे आणि याप्रकरणी तपास सुरू आहे, असा दावा नुकताच पाकिस्तानच्या मंत्र्यांनी केला आहे. दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तांबावर गोळीबार केला होता. सद्यस्थितीत पंजाब पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास दहशतवाद विभागाला सुपूर्द केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी सोमवारी तांबा याच्या हत्येत भारताचा सहभाग असू शकतो, असा संशय तपास संस्थांना असल्याचे म्हटले होते. सरबजीत सिंग यांच्या हत्येप्रकरणी तांबा याला सन २०१३मध्ये मुक्त करण्यात आले होते. तांबा हा लश्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईद याचाही निकटवर्तीय होता, असे समजते.

हे ही वाचा:

‘आयर्न शील्ड’ने हाणून पाडले इराणचे ड्रोन हल्ले!

धुळ्यात डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक!

दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या

ओडिशामध्ये पुलावरून बस कोसळून अपघात; पाच ठार

‘दुचाकीवर स्वार होऊन सरफराज याची हत्या झाली, यात एक पॅटर्न दिसून येतो. पाकिस्तानमधील चार हत्यांमध्ये भारताचा सहभाग असल्याचा संशय आहे. मात्र याबाबत आणखी काहीही सांगण्याआधी चौकशी पूर्ण होण्याची वाट पाहिली पाहिजे,’ असे विधान नकवी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिले. भारत सरकारने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाकिस्तानचा दावा, तांबा अजून जिवंत
पंजाब पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी या घटनेला नाट्यमय वळण देताना तांबा अजून जिवंत असल्याचा दावा केला. लाहोरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सैयद अली रजा यांनी सांगितले की, तांबा अजूनही जिवंत आहे. मात्र जबर जखमी आहे. याबाबत लाहोर पोलिसांचे प्रवक्ते फरहान शाह यांना विचारले असता, त्यांनी हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. महत्त्वाचे म्हणजे रजा यांनी तांबा जर जिवंत आहे तर त्याच्यावर कुठे उपचार सुरू आहेत, हे सांगितलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा