दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी बीआरएस नेत्या के कविता यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिल्ली राउस ऍव्हेन्यू न्यायालयाने सोमवार, १५ एप्रिल रोजी बीआरएसच्या नेत्या के कविता यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. याआधी सीबीआयने १५ एप्रिलपर्यंत के कविता यांना कोठडीत ठेवले होते. दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली न्यायालयाने के कविता यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
के कविता या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. सक्तवसुली संचालयाने के कविता यांना अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. सीबीआयनुसार, के कविता या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणात कट रचणाऱ्यांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. कविता यांच्या कोठडीसाठी सीबीआयने न्यायालयात युक्तिवाद केला की के कविता यांनी आम आदमी पार्टीला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. कविता ही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. एका मोठ्या उद्योगपतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. केजरीवाल यांनी उत्पादन शुल्क धोरणाद्वारे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. सीबीआयने सांगितले की, के कविता यांनी हैदराबादमध्ये याच व्यावसायिकाची भेट घेतली होती. म्हणजेच व्यापारी विजय नायर या कविता यांच्याही संपर्कात होते. व्यावसायिकाने कविता यांना १०० कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेची व्यवस्था करण्यास सांगितले होते. या पैशाची व्यवस्था करण्यात कविता यांचा मोठा वाटा आहे.
हे ही वाचा:
सरबजीत यांचा मारेकरी मारला गेला, मात्र न्याय मिळाला नसल्याची मुलीची खंत
रामनवमीसाठी अयोध्येतील राम मंदिरात प्रसादासाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!
इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा
के कविता यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देत भाजपावर टीका केली. ही सीबीआयची कस्टडी नाही, तर भाजपची कस्टडी आहे, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, सीबीआयने सांगितले की, कोणतीही चुकीची अटक करण्यात आलेली नाही. ५ एप्रिल रोजी न्यायालयाची परवानगी घेतली आणि ६ एप्रिल रोजी तुरुंगात त्यांची चौकशी केली. बेकायदेशीर अटक झालेली नाही. कविता यांच्या पतीलाही कळवले होते. अटक करण्यापूर्वी आणि नंतर कविता यांच्या पतीला फोनवरून माहिती देण्यात आली. कारागृह प्रशासनाने त्यांच्या पतीला याची माहिती दिली.