28 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामाबेंगळुरू स्फोटातील आरोपी अब्दुल ताहा बनला विघ्नेश आणि अनमोल कुलकर्णी

बेंगळुरू स्फोटातील आरोपी अब्दुल ताहा बनला विघ्नेश आणि अनमोल कुलकर्णी

बनावट ओळखपत्रे बनविली, नावे बदलली

Google News Follow

Related

१ मार्च रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी अब्दुल मतीन अहमद ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब या दोघांना एनआयएने १ मार्च रोजी अटक केली आहे. चौकशीत त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एक महिना घालवल्याचे आणि त्यानंतर वारंवार त्यांचा ठावठिकाणा बदलल्याचे उघडकीस आले आहे. ते अनेकदा खोट्या ओळखपत्रांच्या आधारे कमी किमतीच्या लॉजमध्ये राहात असत.

३० वर्षे वयाच्या या दोघांपैकी एकाने बॉम्ब पेरला होता आणि दुसरा या हल्ल्याचा सूत्रधार होता. त्यांना १२ एप्रिलच्या पहाटे कोलकात्यापासून १८० किमी दक्षिणेला असलेल्या न्यू दिघा येथील हॉटेल आयुष इंटरनॅशनल येथून अटक करण्यात आली.
दोघे १२ मार्च रोजी चेन्नईहून कोलकाता येथे पोहोचले आणि मध्य कोलकाता येथील एसएन बॅनर्जी रस्त्यावरील एस्प्लानेड इन नावाच्या हॉटेलमध्ये थांबले. दोघांनी प्रथम तीन दिवस राहू, असे सांगितले होते, परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी चेक आउट केल्याचे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर, १३ मार्च रोजी दुपारी, पाच वाजून ४० मिनिटांच्या सुमारास, त्यांनी पहिल्या हॉटेलपासून पाच मिनिटांपेक्षा कमी अंतरावर असलेल्या हॉटेल पॅराडाइजमध्ये चेक इन केले. ‘येथे ते हॉटेलच्या रुम नंबर आठमध्ये राहत होते. तिथे एका खोलीचे भाडे ७०० रुपये आहे. त्यांनी १४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास चेक आउट केले,’ असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

त्यांनी सतत ठावठिकाणा बदलण्यासाठी कमी-बजेटची, एसी रूम नसलेली हॉटेले निवडली होती. ‘कधी कधी त्यांनी ते सहकारी असून अधिकृत कामासाठी आले आहेत, असे सांगायचे. इतरांना ते व्यावसायिक भागीदार आणि पर्यटक होते, असेही सांगत,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, १४ ते २१ मार्च दरम्यान शाजीब आणि ताहा नंतर उत्तर बंगालमधील दार्जिलिंग आणि नंतर राज्याच्या पश्चिम भागात पुरुलिया येथे गेले आणि २१ मार्च रोजी कोलकाता येथे परतले, जिथे त्यांनी किडरपोर येथील गार्डन गेस्ट हाऊसमध्ये चेक इन केले. “प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी चेक इन केले तेव्हा त्यांनी हॉटेलच्या सीसीटीव्हीवर आपला चेहरा दिसू नये, यासाठी टोप्या आणि मास्क परिधान केला होता,’ असे अधिकाऱ्याने सांगितले.

ते २३ मार्चपर्यंत किडरपोर गेस्ट हाऊसमध्ये राहिले. २४ मार्च रोजी ते कुठे थांबले हे स्पष्ट झाले नाही. परंतु २५ मार्च रोजी ते किडरपोर गेस्ट हाऊसपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या एकबालपूर येथील ड्रीम गेस्ट हाऊसमध्ये गेले. येथे, त्यांनी तीन रात्री घालवल्या आणि २८ मार्च रोजी चेक आउट केले. त्यानंतर पुढचे १२ दिवस त्यांचा कुठेच माग लागला नाही. परंतु त्यांनी हावडा ते दिघा अशी बस पकडण्याची शक्यता आहे. पूर्व मिदनापूरमधील समुद्रकिनाऱ्यावरील लोकप्रिय शहर, न्यू दिघा येथील हॉटेल आयुष इंटरनॅशनलमध्ये दोघे पुन्हा दिसले. त्यांनी चौथ्या मजल्यावरील चार क्रमांकाची खोली भाड्याने घेतली आणि शुक्रवारी सकाळी त्यांना पकडण्यात आले.

हे ही वाचा:

काँग्रेसचे विशाल पाटील मविआ उमेदवाराविरोधात उभे राहणार!

न्याय संहिता, गरिबांना घरे, मोफत अन्न, नोकऱ्यांची हमी…. भाजपचा जाहीरनामा मोदींनी केला घोषित!

संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन!

रिझर्व्ह बँकेने पटकावला आरसीएफ टी- २० चषक

या दोघांनी आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या बनावट ओळखपत्रांचा वापर केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. एस्प्लेनेड इनमध्ये चेक इन करताना शाजीबने जी कागदपत्रे वापरली, त्यात त्याने तो महाराष्ट्रातील युशा शाहनवाज असल्याचा दावा केला. त्याच हॉटेलमध्ये ताहाने स्वतःची ओळख विघ्नेश बीडी अशी करून दिली. पण हॉटेल पॅराडाईजमध्ये ताहाने अनमोल कुलकर्णी म्हणून चेक इन केले. “हॉटेल पॅराडाईजच्या रजिस्टरमध्ये असे दिसून आले आहे की ताहाने प्रथम विघ्नेशा नाव लिहिले. त्यानंतर त्याने पेन वापरून त्यावर कर्नाटकातील रहिवासी अनमोल कुलकर्णी यांचे नाव लिहिले’, अशी माहिती एका अधिकाऱ्याने सांगितले. किडरपोर येथील हॉटेलमध्ये, त्यांनी उदय दास आणि संजय अग्रवाल म्हणून स्वतःची नोंदणी करून पुन्हा बनावट ओळखपत्रे सादर केली.

पोलिस अधिका-यांनी असेही सांगितले की, त्यांनी मध्य कोलकाता येथील चांदनी चौक येथील एका मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे जबाब नोंदवले आहेत. शाजीब तीन मोबाईल फोन घेऊन या दुकानात आल्याचे त्यांना आढळले आहे,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या फोनमध्ये सिम कार्डे होती की नव्हती, हे या दुकानदाराला आठवत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा