भारतासोबतच्या द्विपक्षीय करारांतर्गत हेलिकॉप्टर चालवणाऱ्या भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांचा दुसरा गट ९ एप्रिल रोजी मालदीवमधून रवाना झाला आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी ही माहिती दिली आहे.
मालदीवमध्ये या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संसदीय निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यक्रमा दरम्यान बोलताना मुइझू यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. स्थानिक माध्यमांशी बोलताना मुइझ्झू म्हणाले की, “पहिली टीम आधीच निघून गेली आहे.तर ९ एप्रिल रोजी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील सैनिकांनाही हटवण्यात आले आहे.
हे ही वाचा..
काँग्रेसचे विशाल पाटील मविआ उमेदवाराविरोधात उभे राहणार!
न्याय संहिता, गरिबांना घरे, मोफत अन्न, नोकऱ्यांची हमी…. भाजपचा जाहीरनामा मोदींनी केला घोषित!
संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन!
ते पुढे म्हणाले, आता फक्त एकच प्लॅटफॉर्म शिल्लक आहे.दोन्ही देशांनी आधीच स्वाक्षरी केली आहे, त्यांना (उर्वरित भारतीय लष्करी कर्मचारी) देखील १० मे पूर्वी मागे घेतले जाईल, ते निघून जातील.दरम्यान, भारतीय सैनिकांच्या जागी कोणते सैनिक तैनात केले आहेत किंवा करणार आहेत याची कोणतीही पुष्टी मालदीवकडून करण्यात आलेली नाही.तसेच भारतीय लष्करी जवानांच्या माघारीवर मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने किंवा भारताने भाष्य केलेले नाही.
मालदीव सरकारच्या म्हणण्यानुसार, मालदीवमधील अड्डू आणि लामू काधधूमध्ये एक हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान चालवण्यासाठी 88 भारतीय सैनिक तैनात करण्यात आले होते.या आकडेवारीत सेनाहिया मिलिटरी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचाही समावेश आहे. दरम्यान, भारतीय सैनिकांच्या पहिल्या गटाने ११ मार्च रोजी मालदीव सोडले आहे.आता दुसरा गट देखील मालदीवमधून बाहेर पडला आहे.