महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच महायुती सरकारला साथ देत नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केला. यानंतर, राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? यासंदर्भात वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लागले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेचं आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असे आपणास आणि पक्षाला वाटले, यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले. देशात अनेक विषय प्रलंबित राहिले होते. त्यात राम मंदिराचा विषयही राहू गेला होता. आता राम मंदिरासारखा विषय मार्गी लागला आहे. १९९२ पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले. त्यावेळी कारसेवकांवर गोळ्या घातल्या गेल्या. शरयू नदीत त्यांची प्रेते फेकली गेली होती. राम मंदिरासाठी चाललेले हे दीर्घ आंदोलन विसरता येणार आहे. राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते, अशा शब्दात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी गौरवोद्गार काढले.
नरेंद्र मोदी यांच्या काही न पटणाऱ्या धोरणांचा विरोधही केला आहे. परंतु, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा संधी देणे आवश्यक आहे, असे मला वाटले. त्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला. आता महाराष्ट्रासाठी आपल्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा संरक्षण, मराठी भाषेला अभिजात दर्जा हा विषय आहे, असं राज ठाकरे म्हणाले. गुढी पाडवा मेळाव्यात मनसेचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या पहिल्या पाच वर्षात आम्हाला त्यांचा भूमिका पटल्या नाहीत, तेव्हा टीका केली होती. टीका केली तेव्हा काय मागितलं नव्हतं, पूर्वीच्या मुद्यांवर टीका होती.
हे ही वाचा:
मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण
बंगळूरू कॅफे ब्लास्टच्या मास्टरमाइंडचे वडील होते सैन्यदलात; मुलाच्या कृत्याने दुःखी
लेबनानचा उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ला
अल्पवयीन यझिदी मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना जर्मनीत अटक
“आम्ही भूमिका बदलतो म्हणतात, पण आमच्या भूमिका या मुद्यांवर आहेत, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं आहे. पाच वर्षात काही बदल झाले, त्यामुळे त्यांच्या भूमिकेचं स्वागत ही केलं आहे. राम मंदिर निर्माण, ३७० कलम असे अनेक निर्णय चांगले पंतप्रधानांनी घेतले. पाठिंबा देताना मला पक्षाचा विचार करावा लागतो. ज्यांना ही भूमिका पटत नाही, ते निर्णय घ्यायला मोकळे आहेत,” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.