मशीन चालवताना हात गमावलेल्या एका भारतीय लष्कराच्या जवानाच्या मदतीसाठी भारतीय हवाईदल देवदूत बनले आहे.लडाखमधील फॉरवर्ड युनिटच्या ठिकाणी मशिनरी चालवत असताना जवानासोबत अपघात झाला होता. या अपघातानंतर भारतीय हवाई दल देवदूताच्या रूपात पुढे आले आणि वेळीच एअरलिफ्ट ऑपरेशन करून जवानाला वाचवले.
लष्करी जवानाला शस्त्रक्रियेसाठी लडाखहून दिल्लीला विमानाने नेण्यात आले.एअरलिफ्ट ऑपरेशननंतर दिल्लीतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने जखमी सैनिकावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता जवानाचा हात बरा असून त्याची प्रकृती बरी आहे.या अपघाताची माहिती हवाई दलाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
हे ही वाचा:
डायनासोरसारखी नामशेष होईल ‘काँग्रेस’
शाब्बास डीके! रोहीतची कार्तिकला कौतुकाची थाप…
हवाई दलाने सांगितले की, एका भारतीय जवानाचा फॉरवर्ड युनिट परिसरात असलेल्या युनिटमध्ये मशीन चालवत असताना हात कापला गेला.जवानाच्या उपचारासाठी IAF C-A १३०J या विमानाचा वापर करण्यात आला.जखमी जवानाला दिल्लीतील आर अँड आर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.हाताचा भाग जोडण्यासाठी ६ ते ८ तासाचा कालावधी लागणार असल्याने एका तासाच्या विमान सोडले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.भारतीय वायुसेनेने रात्रीच्या काळोखात केलेल्या एअरलिफ्टमुळे जखमी जवानाला त्वरित वैद्यकीय मदत मिळाली.वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि जवान आता बरे होण्याच्या मार्गावर असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या ऑपरेशनमध्ये नाईट व्हिजन गॉगल्सचा (NVGs) करण्यात आला.हे गॉगल रात्रीच्या वेळी जवानास १२० डिग्रीमध्ये पाहण्याची दृष्टी प्रदान करतात. ते वजनाला अत्यंत हलके असतात आणि रात्रीच्या ऑपरेशनच्या दरम्यान ते हेल्मेटवर घालता येतात.