लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे.गेल्या वर्षी ‘सावन’ या पवित्र महिन्यात मटण खाल्ल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडी आघाडीतील सहयोगी राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांना चांगलेच फटकारले.विरोधी पक्षांच्या नेत्यांना बहुसंख्य भारताच्या भावनांची पर्वा नसल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधानांनी विरोधकांवर चांगलीच तोफ डागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोघांची तुलना मुघलांशी केली आणि त्यांच्यावर ‘देशातील लोकांना चिडवण्याचा’ प्रयत्न केल्याचा आरोप केला.सप्टेंबर २०२३ मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.व्हिडिओमध्ये आरजेडी नेते लालू यादव आणि काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी एकत्र मटण शिजवताना दिसत होते.याच व्हिडिओचा संदर्भ पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या लोकांना देशातील बहुसंख्य जनतेच्या भावनांची पर्वा नाही. लोकांच्या भावनांशी खेळण्यात त्यांना आनंद आहे. ज्या व्यक्तीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे आणि जो जामिनावर आहे.. ते अशा गुन्हेगाराच्या घरी भेट देतात आणि सावन महिन्यात मटण शिजवण्याचा आनंद घेत आहेत.एवढेच नाही त्याचा व्हिडिओ बनवून देशाच्या लोकांना चिडवण्याचे काम केले.
हे ही वाचा:
डायनासोरसारखी नामशेष होईल ‘काँग्रेस’
शाब्बास डीके! रोहीतची कार्तिकला कौतुकाची थाप…
ते पुढे म्हणाले, “कायदा कोणालाही काहीही खाण्यापासून रोखत नाही, नाही मोदी रोखतात, सर्वांना स्वातंत्र्य आहे, कोणीही केव्हाही शाकाहारी आणि मांसाहारीचे जेवण जेव्हा.परंतु या लोकांचे हेतू काहीतरी वेगळे आहेत. मुघलांनी येथे हल्ला केला तेव्हा मंदिरे पाडल्याशिवाय त्यांचे समाधान झाले नाही.मुघलांप्रमाणेच त्यांना सावन महिन्यात व्हिडिओ दाखवून देशातील जनतेला चिडवायचे आहे आणि आपली व्होट बँक पक्की करण्याचा विचार आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, नवरात्रीच्या काळात मांसाहार खाणे, कोणत्या उद्देशाने त्याचा व्हिडिओ बनवून सारखे दाखवणे, लोकांच्या भावना दुखावून कोणाला खुश करण्याचा खेळ करत आहात.ते पुढे म्हणाले, माझ्या वक्तव्याने विरोधक आता दारू गोळा घेऊन, शिव्यांचा वर्षाव माझ्यावर करतील.पंरतु एखादी गोष्ट हाताबाहेर गेल्यास मी बोलणार आणि माझे ते कर्तव्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.