इस्लामचा तीव्र टीकाकार आणि अनेक वेळा सार्वजनिकरित्या कुराण जाळणारा सलवान मोमिक हा जिवंत आहे.काही दिवसांपूर्वी सलवान मोमिकचा मृतदेह नॉर्वेमध्ये सापडला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.मात्र ह्या सर्व अफवा असून सलवान मोमिक हे जिवंत आहेत.सलवान मोमिक यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली.सलवान यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, इस्लामवर कोणी टीका करू नये यासाठी माझ्या मृत्यूची बातमी अफवा पसरवली गेली.
सलवान मोमिक यांनी ट्विट करत लिहिले की, माझ्या मृत्यूची बातमी ज्या वृत्तपत्रांनी आणि वृत्त साईट्सने प्रकाशित केली आहेत ती खोटी आहेत आणि त्यांचा उद्देश फक्त इस्लामवर शंका घेणाऱ्या किंवा टीका करणाऱ्यांना घाबरवण्याचा आहे.त्यामुळे मला एवढेच सांगायचे आहे की, तुमची अफवा पसरवणारी आणि खोटी माध्यमे आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाहीत. मी जिवंत आहे आणि जोपर्यंत नॉर्वेजियन प्रशासन अन्याय करत नाही तोपर्यंत मी आत्मसमर्पण करणार नाही.”
सलवान मोमिक यांना कशाप्रकारे नॉर्वेमध्ये ताब्यात घेतले गेले याबद्दल आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे.ते पोस्टमध्ये म्हणाले की,मी जिवंत आहे आणि माझ्यावर नॉर्वेजियन अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असूनही मी आत्मसमर्पण करणार नाही. मी पोहोचल्यावर त्यांनी मला ताबडतोब अटक केली आणि माझे फोन काढून घेतले. या लोकांनी प्रथम मला कोणाशीही बोलण्यापासून रोखले, नंतर मला न्यायालयात नेले.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ !
“आम आदमी पार्टीला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात के कविता यांची महत्त्वाची भूमिका”
गाय मारल्याप्रकरणी मीरा रोडमधून नईम कुरेशीला अटक
The newspapers and news sites that published the news of my death in Norway are false and their goal is to intimidate everyone who doubts or criticizes Islam. Therefore, I say, your rumors and false media will not scare us. I am alive and will not surrender despite the injustice… pic.twitter.com/PwmDwY9THa
— Salwan momika (@salwan_momika1) April 11, 2024
जिथे कोर्टाने माझ्यावर आरोप केले – ‘तुम्ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहात म्हणून तुम्हाला ताब्यात घेण्यात आले आहे.मूर्ख न्यायाधीशाला कदाचित इस्लाम अधिक प्रिय होता, म्हणून मी म्हणालो की तुरुंग किंवा तुमची न्यायालय मला घाबरवू शकत नाही.पोलिसांनी मला न्यायालयाबाहेर नेले आणि मला एका तुरुंगात ठेवण्यात आले जे मानवाधिकार संघटनांच्या देखरेखीच्या पलीकडे होते. त्यांनी मला कोणाशीही, माध्यमांशी किंवा पत्रकारांशी बोलू दिले नाही.”
उल्लेखनीय आहे की, सालवान मोमिका हे इराणच्या लष्कराचे माजी अधिकारी होते. पुढे ते इस्लामचे सर्वात मोठे टीकाकार बनले. जून २०२३ मध्ये सालवान मोमिका यांनी स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीसमोर कुराण जाळले, ज्याचा व्हिडिओ आणि फोटो सर्वत्र व्हायरल झाले.दरम्यान, २ एप्रिल रोजी सलवान मोमिक यांच्या मृत्यूची बातमी जगभर पसरली होती.मात्र, या सर्व अफवा असल्याचे सांगत मी जिवंत असल्याचे स्वतः सलवान मोमिक यांनी सांगितले आहे.