27 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरविशेषपाकिस्तानमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ !

पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ !

Google News Follow

Related

रमझान २०२४ च्या दरम्यान कराचीमध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. दरोड्यामध्ये १९ जनाचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दरोड्याच्या प्रयत्नात कराचीमध्ये १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी कराची शहरात दरोडा आणि संबंधित मृत्युमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. त्या तुलनेत मागील वर्षी याच काळात दरोड्याविरोधात जोरदार प्रतिकार केल्यामुळे २५ जणांचा मृत्यू तर ११० जण जखमी झाले होते. यंदाची आकडेवारी मात्र चिंताजनक आहे.

नागरिक-पोलीस संपर्क समितीच्या अहवालानुसार २०२३४ च्या पहिल्या तीन महिन्यांत २२ हजार ६२७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये दरोड्याच्या घटनेमध्ये ५९ मृत्यू आणि ७०० पेक्षा जास्त जखमी झाल्याची नोंद आहे. याशिवाय या काळात ३७३ कार, १५ हजार ९६८ मोटारसायकल आणि ६ हजार १०२ मोबाईल फोन चोरीला गेल्याची नोंद आहे. या अहवालात काराचीमध्ये २५ घटना या खंडणीच्या घडल्या आहेत.

हेही वाचा..

“आम आदमी पार्टीला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात के कविता यांची महत्त्वाची भूमिका”

गाय मारल्याप्रकरणी मीरा रोडमधून नईम कुरेशीला अटक

भाजपला मतदान न करण्याची धमकी

रत्‍नागिरी:कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर भाजपच्या वाटेवर!

कराचीचे पोलीस प्रमुख, अतिरिक्त महानिरीक्षक इम्रान याकूब यांनी शहरातील गुन्ह्यांचा एक महत्त्वाचा भाग बाहेरील लोकांना दिला आहे. यात अंतर्गत सिंध आणि बलुचिस्तानमधील व्यक्तींचा समावेश आहे. याकूब यांनी स्पष्टपणे सांगितले की, रमझान आणि ईद-उल-फित्र दरम्यान अंदाजे ४ लाख व्यावसायिक भिकारी आणि गुन्हेगारी करणारे घटक हे कराचीमध्ये येत असतात. कराचीत दैनंदिन गुन्ह्यांचा दर रोजचा १६६ प्रकरणांचा आहे. तो पाकिस्तानमधील इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी आहे. ८ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद आली शाह आणि इतर भागधारकांना संबोधित करताना याकुब म्हणाले, कराचीची गुन्हेगारी बाह्य गुन्हेगारी घटकांकडून आव्हाने असतानासुद्धा कराचीमधील गुन्हेगारीचा दर हा तुलनेने कमीच आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी एका प्रकरणापेक्षा कमी आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा