गाईची हत्या केल्याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी मिरा रोड भागातून नईम सैफ कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी अटक केली. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह ईदच्या आधी गोवंश जातीच्या प्राण्याची हत्या केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी नईमला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, कत्तलीदरम्यान आरोपींसोबत असलेले अन्य दोन साथीदार ९ एप्रिलच्या रात्री पोलिस येत असल्याचे पाहून तेथून पळून गेले. या प्रकरणी भारतीय दंड संहिता, १८६०च्या कलम ४२९ आणि ३२ आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, १९७६च्या कलम ५ सी, ९ ए, ९ बी आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, १९६०च्या कलम ३ आणि ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ९ एप्रिल रोजी रात्री घडली. काशीगाव पोलिस ठाण्याच्या हवालदारांना मुंबईतील मिनाक्षी नगर भागात कत्तलीची घटना घडत असल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना गुरांच्या कातड्याचे अवशेष आणि रक्त आढळून आले. पोलिसांना अवशेषांच्या आसपास एकूण तीन पुरुष दिसले. मात्र पोलिस हवालदार जवळ येत असल्याचे पाहून तिघांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर पोलिसांनी एका आरोपीला पकडले. त्याचे नाव नईम कुरेशी असे आहे.
हे ही वाचा:
रत्नागिरी:कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर भाजपच्या वाटेवर!
सूर्यकुमार, इशान, बूमराहच्या चमकदार खेळीमुळे मुंबईची बंगळुरूवर मात
विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी, उन्हाळी पिकांचे नुकसान
गाईच्या हत्येप्रकरणी नईम कुरेशीला अटक!
चौकशीत आरोपीने इतर दोन आरोपींची ओळख पटवण्यास नकार दिला. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकूसारखे एक मोठे हत्यार, एक जाड दोरखंड आणि गुरांची कातडीही जप्त केली आहे. त्यामुळे घटनास्थळी कत्तलीसारखा प्रकार झाला असावा, याला दुजोरा मिळतो आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने जमा केले असून ते पुढील तपासासाठी पाठवले आहेत. काशीगाव पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले हवालदार चैतन्य नरळे यांनी याबाबतची पोलिस तक्रार केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.