27 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरविशेष'जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, लवकरच विधानसभा निवडणूक होणार'!

‘जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, लवकरच विधानसभा निवडणूक होणार’!

धमपूरमध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी(१२ एप्रिल) प्रचारासाठी जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये पोहोचले. भारतीय जनता पक्षाने उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधानांनी प्रचारादरम्यान एका जाहीर सभेलाही संबोधित केले.जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी यावेळी दिले.आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले, ‘मी गेल्या अनेक दशकांपासून उधमपूरला येत आहे. गेल्या ५ दशकांपासून जम्मू-काश्मीरच्या भूमीवर माझे दौरे सुरू आहेत. १९९२ मध्ये स्थानिक लोकांनी केलेल्या भव्य स्वागताची आठवण देखील पंतप्रधानांनी यावेळी केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘वर्ष २०१४ मध्ये मी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलो होतो आणि याच मैदानावर मी तुम्हाला हमी दिली होती की, जम्मू-काश्मीरच्या अनेक पिढ्यांनी जे त्रास सहन केले त्यापासून मी तुम्हाला मुक्त करेन. आज तुमच्या आशीर्वादाने मोदींनी ती हमी पूर्ण केली आहे. ते पुढे म्हणाले की, ‘ जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार तो दिवस दूर नाही.तुमच्या लोकांनी खूप त्रास सहन केला आहे , मी तुमच्यासाठी खूप मोठे स्वप्न पाहिले आहेत, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळेल आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होतील ती वेळ दूर नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

सावंतवाडीतील गंजिफा कलेला आणि लाकडी खेळण्यांना जीआय मानांकन

बेंगळुरू रामेश्वर कॅफे स्फोटातला मास्टरमाइंड कोलकात्यात सापडला!

संदेशखाली प्रकरणी तक्रारी दाखल करण्यासाठी सीबीआयकडून विशेष ई-मेल जारी

स्विगी डिलिव्हरी बॉयने फ्लॅटबाहेरील शूज चोरले!

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘दशकांनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, जेव्हा दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, बंद, स्ट्राइक, सीमेपलीकडून गोळीबार, हे निवडणुकीचे मुद्दे नाहीत. त्यावेळी माता वैष्णोदेवी यात्रा किंवा अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे कशी पार पाडायची, याची चिंता होती. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये विकास होत आहे आणि विश्वासही वाढत आहे. म्हणूनच आज जम्मू-काश्मीरच्या कानाकोपऱ्यातून एकच प्रतिध्वनी ऐकू येत आहे – पुन्हा एकदा मोदी सरकार.ही निवडणूक केवळ खासदार निवडण्यासाठी नाही, तर ही निवडणूक देशात मजबूत सरकार बनवण्यासाठी असल्याचे पंतप्रधान मोदींनी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा