25 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरराजकारणधैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा

धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा

शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असताना भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शरदचंद्र पवार गटात ते प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. माढ्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी राजीनामा देत भूमिका स्पष्ट केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोहिते पाटील शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, अशा चर्चा आहेत. गुरुवारी धैर्यशील पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी मध्यरात्रीच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राजीनामा म्हणजे भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर आता मोहिते पाटलांनी वेगळा रस्ता धरण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी शरद पवारांना विरोध करून राष्ट्रवादीकडून माढा काढून घेतलेल्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा पवारांना साथ द्यायचं ठरवलं आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरेंनी भूमिका बदलली की, मूळ भूमिकेकडे परतले?

तिकीट मिळाले नसल्याने राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांचा पुन्हा नोकरीसाठी अर्ज

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!

केमोथेरपीनंतर महिलेचे केस गळले,त्वचा खराब झाली, नंतर कळले कर्करोग झालाच नाही!

धैर्यशील मोहिते पाटील यांनी काय म्हटलं आहे?

“भाजपा सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडळ कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटना रचना गठीत करुन कार्यान्वित करण्याचं कार्य केलं. तसंच शक्तीकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही सक्रिय केल्या. वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करुन संघटना व बूथच्या माध्यममातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले. आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो व आपणांस कळवू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती.” असे पत्र त्यांनी लिहिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा