‘भारत आणि चीनमधील स्थिर संबंध केवळ दोन राष्ट्रांसाठीच नाही, तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमधील सीमा विवाद तातडीने सोडवण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
‘भारतासाठी चीनसोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत. माझा विश्वास आहे की, आपण आपल्या सीमेवरील प्रदीर्घ परिस्थितीकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या द्विपक्षीय परस्परसंवादातील त्रुटी दूर करू शकू,’ असे मोदी म्हणाले.
जून २०२०मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील काही ठराविक भागांबाबत भारत आणि चीन यांच्यात सुमारे चार वर्षांपासून वाद सुरू आहेत. यातील अडथळे दूर करण्यासाठी दोन्ही बाजूंनी राजनैतिक आणि उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडल्या आहेत. मात्र त्यात फारशी प्रगती झालेली नाही.
हे ही वाचा:
महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या रेहमानला अटक
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी के.कविता यांना सीबीआयकडून अटक!
“मविआने जागा वाटपाच्या वेळी विश्वासात घेतले नाही”
जम्मू-काश्मीर: पुलवामा येथे सुरक्षा दलाशी चकमक, एक दहशतवादी ठार!
‘दोन्ही देशांनी जमिनीवर शांतता राखण्याचे मान्य केले आहे. भारत आणि चीनमधील स्थिर आणि शांततापूर्ण संबंध केवळ आपल्या दोन देशांसाठीच नाही तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘मला आशा आहे आणि विश्वास आहे की राजनैतिक आणि लष्करी स्तरावरील सकारात्मक आणि रचनात्मक द्विपक्षीय सहभागातून आम्ही आमच्या सीमेवर शांततेची पुनर्स्थापना करू आणि ती टिकवून ठेवू शकू,’ असे पंतप्रधान म्हणाले.