राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज (१० एप्रिल) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीताराम अग्रवाल यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अग्रवाल म्हणाले की, सकाळची वेळ विसरून संध्याकाळी घरी परतलो आहे. मधल्या काळात मी १० वर्ष रस्ता चुकलो होतो. आज मी यू टर्न घेऊन परत आलो आहे. विद्याधर नगरमध्ये आता काँग्रेस झिरो झाली आहे.यापुढे मी मनापासून भाजपाची सेवा करणार असल्याचे सीताराम अग्रवाल यांनी सांगितले.
जयपूरमधील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते औंकर सिंग लखावत आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सीताराम अग्रवाल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जयपूरच्या विद्याधरनगर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते.त्यांच्याविरुद्ध भाजपच्या दिया कुमारी उभ्या होत्या. या निवडणुकीत अग्रवाल यांचा दिया कुमारी यांच्याकडून मोठ्या मतांनी पराभव झाला होता.
हे ही वाचा:
छत्तीसगढमध्ये बस दरीत कोसळली, १२ मजुरांचा मृत्यू!
राम मंदिरात दिसणार अनोखे सोन्याचे रामायण!
बागेश्वर बाबा यांना जीवे मारण्याची धमकी
भारताने डोळे वटारल्यावर कॅनडाचे ट्रुडो वरमले
पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष राहिलेले अग्रवाल म्हणाले की, मी शेवटच्या श्वासापर्यंत दिया कुमारींच्या बाजूने उभा राहणार आहे. दिया कुमारी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ. ते म्हणाले की, माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. २०० रुपये घेऊन नोकरीला सुरुवात केली पण आज मी सारिया कंपनीचा मालक आहे. दरम्यान, सीताराम हे राजधानी जयपूरमध्ये काँग्रेसचे मोठे नेते राहिले आहेत. ते प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्षही राहिले आहेत. अग्रवाल यांनी काँग्रेस सोडल्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री दिया कुमारी म्हणाल्या की, आज विद्याधर नगर काँग्रेसमुक्त झाले आहे. कोरोनापासून मुक्ती मिळाली. काँग्रेससारख्या रोगापासून दिलासा मिळाला आहे. सीताराम अग्रवाल यांनी योग्य वेळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अग्रवाल यांनी मनापासून काँग्रेसची सेवा केली. पण काँग्रेसमध्ये त्यांना काही साध्य झाले नाही. यावेळी एनडीए ४०० पार करेल असा दावा त्यांनी केला. राजस्थानमध्ये भाजप २५ पैकी २५ जागा जिंकेल. भाजपने प्रत्येक घरात नळाचे पाणी, वीज असे सर्व काही दिल्याचे त्यांनी सांगितले.