भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारताच्या विकासाच्या वेगवान प्रवासाचे कौतुक केले आहे. यावेळी ते म्हणाले की, “जर कोणाला भविष्य पाहायचे असेल तर त्यांनी भारतात यावे.” एका कार्यक्रमात बोलताना एरिक गार्सेटी त्यांनी भारताबद्दल गौरवोद्गार काढले.
“तुम्हाला भविष्य पाहायचे असेल, तर भारतात या. तुम्हाला भविष्य अनुभवायचे असेल, तर भारतात या. तुम्हाला भविष्यावर काम करायचे असेल तर भारतात या. यूएस मिशनचा नेता म्हणून प्रत्येक वेळी ते करू शकण्याचा मला मोठा बहुमान मिळाला आहे,” असं अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी भारतात एका कार्यक्रमात म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनीही भारतासोबतच्या देशाच्या संबंधांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील भागीदारी ही नव्या उंचीवर गेली आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सुलिव्हन म्हणाले, अमेरिका आणि भारत यांच्यातील भागीदारी तंत्रज्ञान, सुरक्षा आणि इतर अनेक पैलूंसह नवीन उंचीवर गेली आहे.
हे ही वाचा:
नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा
‘मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही जमीन काबीज करू शकला नाही’
ईडीने सादर केलेल्या पुराव्यांनुसार अरविंद केजरीवालांची अटक योग्यच
‘काँग्रेसच्या मनात विष, राम नावाचा तिरस्कार करते इंडी आघाडी’!
अमेरिकेच्या भूमीवर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट अयशस्वी केल्याप्रकरणी अमेरिकेच्या वकिलांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निखिल गुप्ता नावाच्या भारतीय नागरिकावर आरोप लावल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावात आले आहेत. अमेरिकेने आरोप केला आहे की निखिल गुप्ता एका भारतीय सरकारी कर्मचाऱ्यासोबत काम करत होता आणि त्याने न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या पन्नूनला मारण्यासाठी १,००,००० डॉलर देण्याचे मान्य केले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारताने यापूर्वीच चौकशी समिती स्थापन केली आहे.