आंध्रप्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकाच वेळी होणार आहे. अशातच राज्यात सत्तेत आल्यास कमी किंमतीमध्ये मद्यविक्री करण्याचे आश्वासन आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाने दिले आहे. त्यांच्या या आश्वासनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी मतदारांना हे आश्वासन दिले आहे.
तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू हे कुप्पममधील लोकसभेचे उमेदवार आहेत. कुप्पममध्ये त्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेत आल्यास चांगल्या दर्जाचे मद्य कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. राज्यातील मद्याच्या किंमती कमी व्हाव्यात, अशी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात तेलुगू देसम पक्षाचे सरकार आल्यास आम्ही ४० दिवसांनंतर जनतेला उत्तम दर्जाचे मद्य कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ. ही आमची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रबाबू नायडू यांनी दिली. चंद्रबाबू नायडू म्हणाल्या की, देशात सध्या सर्वच वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. मद्याचे दरही वाढले आहेत. मद्याचे नाव काढताच काही लोकांनी आवाज केला याचा अर्थ मद्याचे दर कमी व्हावे, अशी लोकांची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा..
”मी डॉक्टर नसलो तरी काहींचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवलेत”
हैदराबादच्या लेडी सिंघम माधवी लता म्हणतात, असदुद्दीनला हरवणारच!
रायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, तिघांचा मृत्यू!
काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकी पुरताच!
यावेळी बोलताना त्यांनी जगन मोहन रेड्डी यांनाही लक्ष्य केलं. जगन मोहन रेड्डी यांनी २०१९ मध्ये मद्यबंदीचे आश्वासन दिले होते. मात्र, काही दिवसांत या आश्वासनावरून त्यांनी माघार घेतली. त्यांच्या सरकारने मद्याची किंमत ६० रुपयांवरून २०० रुपयांपर्यंत वाढवली. तसेच १०० रुपये स्वत:च्या खिशात घातले, अशी टीका त्यांनी केली.