पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीत दौऱ्यावर आहेत.त्या ठिकाणी ते भाजप उमेदवाराच्या बाजूने रोड शो आणि जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पिलीभीत येथील महिला बासरी कारागीर हिना परवीन यांनी पीएम मोदींसाठी ५६ इंचाची बासरी तयार केली आहे. ही तीच हिना परवीन आहे जिने भगवान श्री रामासाठी जगातील सर्वात लांब बासरी बनवून अयोध्येला पाठवली होती.त्यावेळी हिना परवीन यांना अयोध्येला जाता आले नाही, त्यामुळेच यावेळी त्यांना स्वतःच्या हाताने पंतप्रधान मोदींना बासरी द्यायची आहे.
पंतप्रधान मोदी मंगळवारी शहरातील ड्रमंड इंटर कॉलेजमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत.भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कॅबिनेट मंत्री जितिन प्रसाद यांच्यासाठी मोठ्या सभेला संबोधित करतील. त्यामुळे येथील लोक ९ तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत, यासोबतच महिला बासरी कारागीर हिना परवीन देखील त्यांची वाट पाहत आहेत.
हे ही वाचा..
निमिष मुळे, झारा बक्षी सर्वोत्तम जलतरणपटू
रशियाच्या नियंत्रिणाखाली असलेल्या अणु केंद्रावर युक्रेनकडून हल्ला
राहुल गांधींच्या सभेपूर्वी मोठा पेच, काँग्रेसच्या बॅनरवर भाजपच्या उमेदवाराचा फोटो!
हिंदू तरुणाला इस्लाम धर्म स्वीकारून कलमा वाचायला लावला!
दरम्यान, पिलीभीतच्या मोहल्ला बशीर खान येथे राहणाऱ्या हिना परवीनने पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ५६ इंची बासरी तयार केली आहे.ही बासरी बनवण्यासाठी दोन ते तीन दिवस लागले. हिना परवीनने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ एप्रिलला येत आहेत, त्यांची छाती ५६ इंच आहे, त्यामुळे ५६ इंच लांब बासरी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी मी जगातील सर्वात लांब बासरी बनवून अयोध्येला पाठवली होती.