हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेतील भाजप उमेदवार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने गोमांस खाण्याच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. विक्रमादित्य सिंहने कंगनाचे नाव न घेता निशाणा साधला होता , ज्यावर आता कंगना राणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या आरोपावर कंगना म्हणाली की, मी बीफ किंवा इतर कोणतेही रेड मीट खात नाही. हे अत्यंत निंदनीय असून माझ्याविरोधात निराधार अफवा पसरवल्या जात आहेत. मी अनेक वर्षांपासून योगिक आणि आयुर्वेदाचे समर्थन आणि प्रचार करत आली आहे. माझी प्रतिमा मलीन करण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा काहीही परिणाम होणार नाही. माझ्या लोकांना माहित आहे की मी एक अभिमानी हिंदूआहे. त्याची कोणीही दिशाभूल करू शकत नाही. जय श्री राम”, असे कंगना रणौत यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा..
इस्रायल-हमास युद्ध: एक ब्रिगेड वगळता दक्षिण गाझामधून इस्रायलचे सर्व सैन्य माघारी!
‘काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून चालवला जातो’
आत्महत्येपूर्वी सलग २९ तास अनन्वित छळ!
पंतप्रधान मोदी यांनी अचानक रोड शो मार्ग वाढवला
काय म्हणाले होते विक्रमादित्य सिंह?
काँग्रेसच्या सुखू सरकारमधील कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी नाव न घेता कंगना यांच्यावर टिप्पणी केली होती.विक्रमादित्य सिंह म्हणाले होते, “हिमाचल हे देवी-देवतांचे पवित्र स्थान आहे. देवभूमी आहे. गोमांस खाणाऱ्यांनी इथे निवडणूक लढवावी, हे इथल्या संस्कृतीसाठी चिंतेची बाब आहे, ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.
दरम्यान, विक्रमादित्य सिंग यांना आता मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणौत यांच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवारी दिली जात आहे. प्रतिभा सिंह यांनी न्यूज१८ ला ही माहिती दिली आहे.विक्रमादित्य सिंग पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. विक्रमादित्य सिंह यांच्या आई प्रतिभा सिंह या मंडी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिल्या आहेत.सध्या त्याच खासदार आहेत.