25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेष४१ दिवस शांततेचे...

४१ दिवस शांततेचे…

मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचाराची एकही घटना नाही

Google News Follow

Related

गेल्या ४१ दिवसांत मणिपूरमध्ये एकही वांशिक संघर्ष, हिंसाचार अथवा हत्येची घटना घडलेली नाही. ३ मेपासून उसळलेल्या हिंसाचारापासून आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा हिंसाचारविरहित कालावधी मानला जात आहे.वांशिक संघर्षाची भीती असल्याने सुरक्षा दल अजूनही आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्या दरम्यानच्या बफर झोनमध्ये तैनात आहे. २७ फेब्रुवारी रोजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची आरम्बई तेंग्गोल या कट्टरवाद्यांच्या गटाने अपहरण केले होते. त्यामुळे पोलिस दल एकजूट झाले असून दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या बंदोबस्तामुळे एकही हिंसाचाराची घटना घडली नसावी, असे सांगितले जाते आहे.

’२७ फेब्रुवारी रोजी मणिपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोइरांगथेम अमित सिंग यांचे अपहरण झाल्यानंतर, हत्या किंवा संघर्षाची एकही घटना घडलेली नाही. अपहरणाने पोलिस दलाला एकजूट केले. पोलिस अधीक्षकाच्या बाबतीत असे घडू शकते, तर ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. अपहरणाच्या एका दिवसानंतर, मणिपूर कमांडोज, ज्यांच्यावर आदिवासी गटांनी पक्षपात केल्याचा आरोप केला होता, त्यांनीही निषेधार्थ शस्त्रे खाली ठेवली. वास्तविक, बहुतेक पोलिस अधिकारी सुरुवातीपासूनच या अतिरेकी गटावर नाराज होते, परंतु त्यांचे हात बांधलेले होते. त्यांना पोलिस आणि राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याची गरज होती. ते समर्थन अपहरणाच्या घटनेनंतर मिळाले,” असे मणिपूरमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा..

इस्रायल-हमास युद्ध: एक ब्रिगेड वगळता दक्षिण गाझामधून इस्रायलचे सर्व सैन्य माघारी!

‘काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून चालवला जातो’

आत्महत्येपूर्वी सलग २९ तास अनन्वित छळ!

पंतप्रधान मोदी यांनी अचानक रोड शो मार्ग वाढवला

अपहरणानंतर एका दिवसानंतर पोलिस कमांडोंनी नोकरीवर असताना त्यांच्या जीवाला धोका असल्याबद्दल मुख्यमंत्री बिरेन सिंग यांची भेट घेतली.२७ फेब्रुवारीच्या संध्याकाळी सिंह आणि आणखी एका पोलिस अधिकाऱ्याचे या अतिरेकी गटाने इंफाळ पश्चिम येथील त्यांच्या घराबाहेरून अपहरण केले. अधिकाऱ्याची सुटका न केल्यास पोलिसांनी ‘युद्ध’ करण्याचा इशारा दिल्यानंतर सिंह यांना दोन तासांनंतर रुग्णालयाच्या बाहेर सोडण्यात आले.ही कट्टरवादी संघटना नागरिकांवर हल्ला करणे, वाहने हिसकावणे आणि खंडणी वसूल करणे यासारख्या असामाजिक कृत्यांमध्ये गुंतलेली आहे. त्यांच्या संरक्षणाच्या नादात ते जनतेकडून खोटे समर्थनही मिळवत आहेत, असा दावा पोलिस करतात.

गेल्या महिन्यात, काँग्रेस लोकसभा उमेदवार आल्फ्रेड कांगम आर्थर यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान उखरुल येथे १८ आणि १९ मार्च रोजी पोलिस आणि अतिरेक्यांमध्ये गोळीबार झाला होता, परंतु अधिकाऱ्यांनी हा जातीय संघर्ष असल्याचे नाकारले आणि नागा अतिरेकी गटांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले.४१ दिवसांच्या या सध्याच्या विरामापूर्वी गेल्या वर्षी ४ ते ३० डिसेंबर दरम्यान २६ दिवस, जातीय हिंसाचारात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. मात्र गोळीबाराच्या तुरळक घटना घडल्या.
तरीही ही शांतता तात्पुरतीच असल्याचे सांगितले जाते. राज्य अजूनही विभागलेले आहे. मैतेई आणि कुकी गट राज्याच्या विविध भागांत राहतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा