खलिस्तानी समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेटचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या आईला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपाल सिंग याची आई बलविंदर कौर यांना अटक करण्यात आली आहे. ‘चेतना मार्च’च्या एक दिवस आधी पोलिसांनी बलविंदर कौर यांना अटक केली आहे. अमृतपाल सिंगची आई बलविंदर कौर या सोमवार, ८ एप्रिल रोजी ‘चेतना मार्च’ काढणार होत्या. याआधीचं त्यांना अमृतसरमध्ये अटक करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
बलविंदर कौर या आपला मुलगा अमृतपाल सिंग याला आसाम तुरुंगातून पंजाबच्या तुरुंगात हलवण्याच्या मागणीसाठी ‘चेतना मार्च’ काढणार होत्या. या पार्श्वभूमीवर रविवार, ७ एप्रिल रोजी संध्याकाळी पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या आईला अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी बलविंदर कौर, सुखचैन सिंग आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून बलविंदर कौरला अटक करण्यात आली आहे. बलविंदर कौर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हे ही वाचा..
मोदीच्या गॅरंटीमुळे इंडी आघाडी चिंतेत!
पंजाबमध्ये ५५ वर्षीय महिलेची नग्न धिंड; तिघांना अटक, दोघांचा शोध सुरू
कंगना रनौटमुळे सुरू झाली चर्चा; बरकतुल्लाह, सुभाषचंद्र बोस की नेहरू?
कॉंग्रेसची नारी न्याय योजना दिशाभूल करणारी
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी नेता अमृतपाल सिंग याला अटक करण्यात आली होती. अमृतपाल सिंग आणि त्याचे नऊ साथीदार सध्या आसाममधील दिब्रुगड तुरुंगात आहेत. गेल्या वर्षी अमृतपाल सिंग आणि त्यांच्या काही समर्थकांनी पंजाबमधील अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. अमृतपाल सिंगचा समर्थक लवप्रीतच्या सुटकेच्या मागणीवरून पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता.