रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नसून अजूनही दोन्ही बाजूंनी हल्ले- प्रतिहल्ले सुरूच आहेत. अशातच आता रशियावर युक्रेनने हल्ला केला आहे. रशियाच्या नियंत्रिणाखाली असलेल्या झापोरिझ्झिया अणु केंद्रावरील शटडाउन अणुभट्टीवर रविवारी युक्रेनने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याबाबतची माहिती प्लांटच्या रशियाने नेमलेल्या प्रशासनाने दिली आहे.
रशियाच्या नियंत्रिणाखाली असलेल्या झापोरिझ्झिया अणु केंद्रावरील शटडाउन अणुभट्टीवर झालेल्या हल्ल्यासाठी कशाचा वापर केला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा ड्रोन हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासानंतर बोलले जात आहे. २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियन सैन्याने हा अणु प्रकल्प ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या या अणु प्रकल्पावर हा ड्रोन हल्ला होता, असे रशियन सरकारी अणु एजन्सी ‘रोस्टम’ने सांगितले.
हे ही वाचा..
”मी डॉक्टर नसलो तरी काहींचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवलेत”
हैदराबादच्या लेडी सिंघम माधवी लता म्हणतात, असदुद्दीनला हरवणारच!
रायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, तिघांचा मृत्यू!
काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकी पुरताच!
प्लांट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झाला तेव्हा रेडिएशनची पातळी सामान्य होती आणि हल्ल्यानंतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. साईटवरील कॅन्टीनजवळ ड्रोन आदळल्यामुळे तीन व्यक्तींना दुखापत झाल्याचे समोर आले आहे. युरोपमधील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र असलेल्या, झापोरिझ्झिया अणुऊर्जा केंद्रात सोव्हिएत युनियनने डिझाइन केलेले सहा युरेनियम-२३५ वॉटर-कूल्ड आणि वॉटर-मॉडरेटेड VVER-1000 V-320 अणुभट्ट्या आहेत. प्लांटच्या प्रशासनानुसार, अणुभट्ट्या क्रमांक एक, दोन, पाच आणि सहा बंद अवस्थेत आहेत, अणुभट्टी क्रमांक तीन देखभालीसाठी बंद आहे आणि अणुभट्टी क्रमांक चार ‘हॉट शटडाउन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आहे.