मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर आहेत.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूर येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला.ते म्हणाले, “राजू पारवे यांच्यासाठी डॅाक्टरांनी सहकार्य केलं. मी कोरोना झालेला डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्यांना धीर दिला. मी डॅाक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टरांनी देवदुतासारखं काम केलं आहे. मी डॅाक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले. साधा माणूस, दिल्लीत जावून दोन वेळा खासदार झालेल्या नेता कृपाल तुमाने यांना मी सांगितल यावेळेसतुम्ही निवडणूक लढवायची नाही. ते तयार झाले. आता खासदारापेक्षा मोठा मान तुमाने यांना देणार आहे. जीवदान देणारं परमेश्वराचं रुप म्हणून डॅाक्टर्सकडे आपण पाहतो. मी येताना जुपीटर रुग्णालयात फोन केला. डॅाक्टर्सला फिज कमी करायला सांगतो. रुग्णाचे काही पैसे आम्ही देतो. मलाही दोन वेळा कोविड झाला. त्यावेळेस मला सात रेमडीसीवीर देऊन टाकल्या, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा..
हैदराबादच्या लेडी सिंघम माधवी लता म्हणतात, असदुद्दीनला हरवणारच!
रायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, तिघांचा मृत्यू!
काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकी पुरताच!
ओवैसींविरोधात लढणाऱ्या माधवी लता यांचे पंतप्रधानांकडून कौतुक
ते पुढे म्हणाले, रामटेकचा उमेदवारी अर्ज भरायला गेलो होतो, गडकरी साहेबांचा देखील अर्ज भरायला गेलो. अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या विदर्भात महायुतीला आहे, विदर्भाचा सर्वच सर्व जागा महायुती जिंकेल अशा प्रकारचे वातावरण असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.रामटेक आणि यवतमाळ हा मतदारसंघ मोठ्या फरकाने आम्ही जिंकू, असा विश्वास देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदेनी व्यक्त केला.
विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले, त्यांना या व्यतिरिक्त दुसरे काही काम नाही.पदाधिकाऱ्यांच्या बैठका निवडणूक काळामध्ये सातत्याने होत असतात. आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवतो.शेवटी तळागाळापर्यंत पदाधिकारी कार्यकर्ते काम करत असतात. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाही, त्याला प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावं लागत आणि आम्ही ते करतो.नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वजण फिल्डवर जाऊन काम करतो.त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा आपले पाहावे, असे विरोधकांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले.ते पुढे म्हणाले, तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी महाविकास आघाडीची सध्याची परिस्थिती आहे.दोन प्रादेशिक पक्षाकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही. नॅशनल पार्टीची काय परिस्थिती त्यांनी विचार करावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.