गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात नमाज अदा करण्यावरून परदेशी विद्यार्थ्यांसोबत झालेल्या वादानंतर ७ अफगाण विद्यार्थ्यांना वसतिगृहाची खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे.यातील पाच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच वसतिगृह सोडले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या महिन्यात काही परदेशी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या आवारात नमाज पठण केल्याने गोंधळ झाला होता.यावेळी बाहेरून आलेल्या २०-२५ जणांनी विद्यार्थ्यांना मारहाण करून तोडफोड केली.या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत २५ जणांविरुद्ध एफआयआर देखील नोंदवला होता.हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयापर्यंत पोहचले होते, त्यानंतर अफगाणिस्तानच्या शिष्ठमंडळानेही विद्यापीठाला भेट दिली.
हे ही वाचा..
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्टॅलिन यांनी दिली दोन मिनिटांची मुलाखत!
सीएए रद्द करणे, कलम ३७० पुन्हा लागू करणार, एफडीआयवर निर्बंध, खासगी क्षेत्रात आरक्षण!
हनुमान चालिसा वाजवणाऱ्या दुकानदाराला मारहाण;कर्नाटक पोलिसांकडून दुकानदारावरच गुन्हा!
जोस बटलरच्या १०० धावा विराटच्या ११३ धावांपेक्षा सरस!
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्यास सांगितले आहे, त्यांचे एकतर शिक्षण पूर्ण झाले आहे किंवा फक्त काही औपचारिकता बाकी आहेत, ज्यासाठी त्यांना वसतिगृहात राहण्याची आवश्यकता नाही.विद्यापीठाच्या नियमानुसार, विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास संपल्यानंतर वसतिगृहाची सुविधा वापरता येत नाही.ज्या ७ विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यास सांगितले आहे ते सर्व या वर्गात मोडतात.दरम्यान, गुजरात विद्यापीठात सध्या सुमारे १८० परदेशी विद्यार्थी आहेत.
या संदर्भात माहिती देताना विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.नीरजा गुप्ता म्हणाल्या की, सात पैकी पाच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच वसतिगृह सोडले आहे.उर्वरित दोन विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.