आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी(६ एप्रिल) काँग्रेस पक्षावर हल्ला चढवत काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर टीका केली.हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर आरोप करत म्हटले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा भारतापेक्षा पाकिस्तानमधील निवडणुकांसाठी अधिक योग्य आहे.तसेच सत्तेत येण्यासाठी समाजात फूट पाडण्यावर या जाहीरनाम्याचे लक्ष्य असल्याचे सरमा म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात पक्षाचा शुक्रवारी (५ एप्रिल) जाहीरनामा प्रसिद्ध केला.हा जाहीरनाम्यात ‘पाच न्यायमूर्ती आणि २५ हमी’ वर आधारित आहे.तसेच अनेक प्रकारची आश्वासने पक्षाकडून देण्यात आली.
हे ही वाचा:
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्टॅलिन यांनी दिली दोन मिनिटांची मुलाखत!
सीएए रद्द करणे, कलम ३७० पुन्हा लागू करणार, एफडीआयवर निर्बंध, खासगी क्षेत्रात आरक्षण!
हनुमान चालिसा वाजवणाऱ्या दुकानदाराला मारहाण;कर्नाटक पोलिसांकडून दुकानदारावरच गुन्हा!
जोस बटलरच्या १०० धावा विराटच्या ११३ धावांपेक्षा सरस!
दरम्यान, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी टीका केली.सरमा म्हणाले की, “हे तुष्टीकरणाचे राजकारण आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. हा जाहीरनामा भारतातील निवडणुकीसाठी नसून पाकिस्तानसाठी आहे असे वाटते”.जोरहाट मतदारसंघातील निवडणूक रॅलीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना सरमा बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, देशातील कोणालाही, हिंदू किंवा मुस्लिमांना तिहेरी तलाकचे पुनरुज्जीवन नको आहे किंवा बालविवाह किंवा बहुपत्नीत्वाचे समर्थन करायचे नाही. समाजात फूट पाडून सत्तेत येण्याची काँग्रेसची मानसिकता आहे, असे सरमा म्हणाले.तसेच राज्यातील सर्व १४ लोकसभेच्या जागा भाजप जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आसाममध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल आणि ७ मे रोजी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे