27 C
Mumbai
Friday, November 29, 2024
घरविशेष‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाचे मराठी कलाकारांकडून कौतुक!

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाचे मराठी कलाकारांकडून कौतुक!

कलाकारांच्या पोस्ट चर्चेत

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.२२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने केले असून या चित्रपटात तो स्वत: मुख्य भूमिकेत दिसत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट २९ मार्चला मराठी भाषेत प्रदर्शित झाला.दरम्यान, या चित्रपटाबद्दल अनेक मराठी कलाकारांच्या विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.अभिनेते प्रवीण तरडे,अभिनेता प्रसाद ओक,अभिनेत्री अमृता खानविलकर,अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि अभिनेता सौरभ गोखले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेते प्रवीण तरडेंनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ट्विट केले की, ॥ धर्मो रक्षति रक्षित:॥ अफाट अचाट आयुष्य जगलेल्या, जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या, महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्ट. ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा,’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. प्रवीण तरडेंची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

अभिनेता प्रसाद ओकने यांनी देखील चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.नुकतेच आयोजन करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला मराठी कलाकारांसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. याबाबत अभिनेता प्रसाद ओकने देखील पोस्ट शेअर करत स्वतःला चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले.प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर” अप्रतिम चित्रपट…!!! अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी. अतिशय संयत अभिनय. उत्तम पटकथा. देखणं छायाचित्रण. परिणामकारी पार्श्वसंगीत. रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि संपूर्ण टीम चं मनःपूर्वक अभिनंदन…!!! चित्रपट आता “मराठीत” सुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र सुबोध भावे यांनी सावरकरांना आवाज दिलेला आहे.कोणत्याही खोट्या posts कडे लक्ष देऊ नका. चित्रपट उत्तम प्रतिसादात चालू आहे. या निमित्तानी पुन्हा एकदा “सावरकरांना” त्रिवार वंदन…!!!! जय हिंद…!!!”, असे प्रसाद ओकने म्हटले आहे.

हे ही वाचा.. 

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची ‘छाप’!

१९८४ साली दोन सीट ते २०२४ला ४०० जागा पार करण्याचे लक्ष्य!

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा गायब

पंतप्रधान मोदींच्या फोटोंमुळे पालटले लक्षद्वीपचे नशीब!

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे आणि कलाकारांचे कौतुक केलं.आपल्या इन्स्टाग्रामवर सावरकर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अभिनेत्री म्हणाली की, “काल स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट मराठीमध्ये पाहण्याची संधी मला मिळाली. रणदीप हुड्डा सरांनी वीर सावरकर यांच्या आयुष्याचं कुशलतेनं रचलेलं आणि सादर केलेलं जणू चित्र मला पाहायला मिळालं. त्यांच्या आयुष्यातील प्रवास हा सुंदर सिनेमॅटोग्राफीमुळे हुबेहुबे पाहायला मिळाला. चित्रपटात असे काही क्षण आहेत जे तुम्हाला वेदना … राग … दुःख …. असहायता …. या सगळ्यांची एक रोलर कोस्टर राईड करुन दाखवते. अंकिता लोखंडेनं यमुना बाई म्हणून अप्रतिम अभिनय केला आहे. यमुनाबाई यांच्यात असलेली ताकद अंकूनं दाखवली आहे. अंकू तुला सलाम. काय कमाल आहे. याशिवाय लास्ट बट नॉट द लिस्ट सुबोध भावेच्या आवाजानं मला त्या भूमिकेनं कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना केला, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याची अॅक्शन आणि भावना या प्राकर्षानं जाणवल्या. जबरदस्त.”, असे अभिनेत्री अमृता खानविलकर हिने म्हटले आहे.

सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले की, ‘प्रत्येकाने पहायला हवा’.मी दुसऱ्या सिनेमात व्यस्त आहे. म्हणून मला अजून बघणं जमलं नाही.पुढील दोन दिवसात मी बघून एक छान व्हिडिओ करून प्रसारित करणार आहे. हे सांगण्याचं कारण खूप लोक मला विचारताहेत की तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाहीत तर सिनेमा अधिक बघावा आणि मग सविस्तर त्यावर बोलावं असं ठरवलेलं आहे. पुढील चार दिवसात माझा व्हिडिओ येईलच, असे अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले. दरम्यान, शरद पोंक्षे यांच्या पोस्टनंतर चाहते त्यांच्या व्हिडीओच्या प्रतीक्षेत आहेत.

मराठमोळा अभिनेता सौरभ गोखले याने देखील चित्रपटाबद्दल आपले मत मांडत अभिनेता रणदीप हुड्डा यांचे आणि सर्व कलाकारांचे कौतुक केले आणि सर्वांनी हा चित्रपट न चुकता पाहावा, असे आवाहन देखील अभिनेत्याने केले आहे. अभिनेता सौरभने सोशल मीडियावर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिले की, रणदीप हुडा या माणसाच्या डेडिकेशन ला सलाम आहे.. साक्षात याने तात्याराव समोर उभे केलेत.. हि व्यक्तिरेखा तो जगलाय.. वीर सावरकरांचं संपूर्ण आयुष्य आणि कार्य २ तासात दाखवणं हे केवळ अशक्य आहे. आणि आत्ताची पिढी या व्यक्तिमत्वापासून ठरवून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असण्याच्या काळात एका अमराठी माणसानी प्रचंड अभ्यास करून हि व्यक्तिरेखा लोकांसमोर उभ करणं हे अत्यंत धाडसाचं आणि अभिमानास्पद कार्य !! नतमस्तक !!अमित सियाल , राजेश खेरा, अंकिता लोखंडे आणि इतर सर्वांची कामेही अप्रतिम !!न चुकता हा चित्रपट प्रत्येकाने बघा !!, अशी पोस्ट अभिनेत्याने केली आहे.

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनीही ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी खास पोस्ट लिहिली अन लहानपणीची आठवणसुद्धा सांगितली.सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, ‘मी १२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी मला शाळेच्या सुट्टीत वाचण्यासाठी एक पुस्तक दिले होते. ते पुस्तक जाडजूड होते. सुट्टी संपेपर्यंत मी ते पुस्तक वाचून काढणं अपेक्षित होतं. मी ते वाचायला सुरुवात केली आणि वाचून पूर्ण होईपर्यंत ते पुस्तक खाली ठेवू शकले नाही. सुरुवातीला या वाचनात अनेकदा व्यत्यय आला कारण मी रडले, दु:खी झाले आणि पुस्तक अर्ध वाचून होईपर्यंत माझं मन सुन्न झालं होतं. हेच पुस्तक आता चित्रपटाच्या रुपात जिवंत झालंय. ‘माझी जन्मठेप’ असे पुस्तकाचं नाव आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे चित्रपटाचं नाव आहे. तुम्ही हा चित्रपट बघण्याची हिंमत दाखवणार का,’ असा सवालही त्यांनी नेटकऱ्यांना केला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
201,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा