हैदराबादने चैन्नईचा सहा विकेटने पराभव केला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करून पाच विकेट गमावून १६५ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना हैदराबादने १६ चेंडू राखून चार विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. हैदराबादच्या वतीने एडेन मार्करॅमने ३६ चेंडूंवर चार चौकार आणि एका षटकारासह ५० धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्याचा फायदा संघाला झाला. चेन्नईकडून मोइन अली याने दोन विकेट घेतल्या. चेन्नईला याआधी दिल्लीनेही पराभूत केले होते. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. अभिषेकला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडले गेले.
अभिषेक-हेडची तुफान खेळी
लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी तुफान खेळ केला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा याने मुकेश चौधरीच्या दुसऱ्या षटकात धावा चोपल्या. अभिषेकने मुकेशचे चौकारासह स्वागत केले आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला. हा चेंडू नो बॉल असल्याने मिळालेल्या फ्री हिटवर अभिषेकने षटकार ठोकला. हे षटक चेन्नईला भलतेच महागात पडले. याआधी हैदराबादची फलंदाजी सुरू असताना मोइन अली याने दुसऱ्याच चेंडूवर ट्रेविस हेडचा सोपा झेल सोडला. तेव्हा त्याने खातेही उघडले नव्हते.
हेडने जीवदानाचा उचलला फायदा
अभिषेक बाद झाल्यानंतर हेड याने एडेन मार्करम याच्या सोबतीने धावसंख्या करत जीवदानाचा चांगलाच फायदा उचलला. त्यांनी सातत्याने चांगले फटके लगावले. हैदराबादने पॉवरप्लेपर्यंत एक विकेट गमावून ७८ धावा केल्या. त्याची ही आयपीएलच्या इतिहासातील पॉरवप्लेची तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. हेड अर्धशतकापर्यंत पोहोचत असतानाच महेश तीक्षणा याने हेडला बाद करून हैदराबादला दुसरा धक्का दिला.
मार्करमची तुफान खेळी
हेड आणि अभिषेकने हैदराबादच्या विजयाचा पाया रचला होता. मात्र ते हैदराबादला विजयापर्यंत पोहोचवू शकले नाहीत. त्यानंतर मार्करम याने जबाबदारी सांभाळली. त्यांनी शानदार फलंदाजी करून ३६ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. त्यानंतर तो लगेचच बाद झाला. मोइन अली याने त्याला एलबीडब्ल्यू केले. त्यानंतर मोइन याने शाहबाज अहमद यालाही एलबीडब्ल्यू करून तंबूत पाठवले. तर, हेनरिच क्लासेन (नाबाद १०) और नीतीश रेड्डीयाने आठ चेंडूंमध्ये एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४ धावा करून नाबाद खेळी केली.
मोठी भागीदारी न झाल्याने पराभव
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड़ आणि रचिन रवींद्र चांगली सुरुवात करण्यासाठी आले. ऋतुराज गायकवाड़ने रचिनसोबत चांगली सुरुवात करून दिली. मात्र भुवनेश्वर कुमार याने त्यांची जोडी फोडली. हैदराबादचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने रचिन रवींद्रला झेलबंद केले. रचिन याने नऊ चेंडूंवर १२ धावा केल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे याने धावसंख्या हलती ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली. आठव्या षटकात ऋतुराज गायकवाड़ याने विकेट गमावली. गायकवाडची विकेट शाहबाज अहमदने घेतली. गायकवाडने २१ चेंडूंत २६ धावा केल्या.
शिवमने खेळ सांभाळला
शिवम दुबेने अनुभवी गोलंदाज अजिंक्य रहाणे याच्यासोबत चांगली खेळी केली. त्यामुळे चेन्नईने नऊ षटकांत दोन विकेट गमावून ८० धावा केल्या. शिवम आणि रहाणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
हे ही वाचा:
इराणी वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यामुळे मध्य पूर्वेकडील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती
बलुचिस्तानमधून महिन्याभरात २२ जणांचे अपहरण
पाकिस्तान लष्कराकडून पत्नीवर विषप्रयोग; इम्रान खान यांचा आरोप
मोदींच्या काळात वाढली राहुल गांधींची शेअर बाजारातील गुंतवणूक
कमिन्सने शिवमला बाद केले
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने शिवमला बाद करून तिसरे यश मिळवले. शिवम अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. त्याने २४ चेंडूंत ४५ धावा केल्या. जयदेव उनादकट याने अजिंक्य रहाणे याला बाद केले. त्याने ३० चेंडूंत ३५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजा याने चेन्नईची धावसंख्या १५०पर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले. मात्र २०व्या षटकात डेरिल मिचेल टी नटराजनच्या चेंडूवर बाद झाला. मिचेल याने ११ चेंडूंवर १३ धावा केल्या.
धोनी मैदानात उतरताच जल्लोष
चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी शेवटचे तीन चेंडू खेळण्यासाठी मैदानात उतरताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. मात्र धोनी दोन चेंडूंमध्ये एक धाव करून बाद झाला. रवींद्र जडेजा शेवटपर्यंत टिकून राहिला आणि त्याने २३ चेंडूंवर चार चौकारांसह ३१ धावा केल्या. जाडेजा आणि शिवमच्या खेळीमुळे चेन्नईला तेवढी तरी धावसंख्या उभारता आली.