शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका खेकड्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी म्हणून नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या आरोपांच्या संदर्भासाठी थेट जिवंत खेकडाच सादर केला होता. यामुळे ते अडचणीत आले आहेत. प्राणी अधिकार संघटना ‘पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ ऍनिमल’ अर्थात PETA ही संघटना आक्रमक झाली आहे.
पेटाने म्हटलं आहे की, रोहित पवार यांचे कृत्य हे पशू क्रूरता निवारण अधिनियमाच्या आदर्श आचारसंहितेसह निवडणूक आयोगाच्या निर्देशांचं देखील उल्लंघन आहे. शरद पवार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल काळस्कर यांना लिहिलेल्या पत्रात पेटा इंडियाच्या शौर्य अग्रवाल यांनी म्हटलं की, व्हिडिओवरुन हे स्पष्ट होतं की रोहित पवार पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा आणणार होते हे पूर्वनियोजित होतं. पत्रकार परिषदेत स्टंट करण्यासाठी एका जीवाला अनावश्यक त्रास देण्यात आला आहे.
शौर्य अग्रवाल यांनी म्हटलं की, संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे खेकडे खूपच हुशार असतात त्यांना आपल्याला झालेला त्रास जाणवतो. तसेच त्यांना वातावरणाची जाणीवही असते, त्यामुळं ते एकमेकांशी संवादही साधतात. पेटानं आपल्या पत्रात म्हटलं की, संघटनेनं निवडणूक आयोगाला या बाबीची माहिती देण्यात आला आहे. यामध्ये म्हटलं की निवडणूक प्रचार सभा आणि रॅलीजसाठी प्राण्यांना त्रास दिला जातो आहे. यानंतर निवडणूक आयोगानं राजकीय प्रचारासाठी प्राण्यांच्या वापरावर प्रतिबंध लावला होता.
हेही वाचा..
बलुचिस्तानमधून महिन्याभरात २२ जणांचे अपहरण
पाठ्यपुस्तकातून बाबरीचा ‘ढाचा’ हटवून अयोध्येचे राममंदिर!
‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा!
राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये मुस्लिम लीगच्या भीतीने काँग्रेसचेही झेंडे गायब?
यामध्ये म्हटलं की, सन २०१३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक प्रचारादम्यान, गाढव, बैल, हत्ती आणि गाईंच्या वापरावर प्रतिबंध लावला होता. तसेच उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पेटानं रोहित पवारांना देखील पत्र लिहून आणि त्यांच्याकडून खेकडा सोपवण्याची शिफारस केली की त्या खेकड्याची देखभाल केली जावी. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोग आणि शरद पवारांना पत्र लिहून रोहित पवारांवर कारवाईची मागणी केली आहे.