32 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरराजकारणसंजय राऊत यांच्या कानपिचक्या: काँग्रेसने दिल्लीत राजकारण करावे, गल्लीत नव्हे!

संजय राऊत यांच्या कानपिचक्या: काँग्रेसने दिल्लीत राजकारण करावे, गल्लीत नव्हे!

सांगलीच्या वादावरून व्यक्त केले मत

Google News Follow

Related

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. एकीकडे ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाताने ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे समोर आले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने दिल्लीवर लक्ष ठेवावे, गल्लीतल्या राजकारणात पडू नये, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

काँग्रेसला त्यांचा पंतप्रधान नको असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे

“सांगलीची जागा हा काँग्रेससाठी वादाचा विषय होऊ शकत नाही. सांगलीची जागा महाविकास आघाडीची आहे. राज्यातील ४८ जागा कोण्या एका पक्षाच्या नसून महाविकास आघाडीच्या आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो, तर त्याचे चांगले परिणाम दिसतील. याचा फायदा काँग्रेसलाच केंद्रात होऊ शकतो. सांगलीची लढाई सुद्धा काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा यासाठी आहे. काँग्रेसला त्यांचा पंतप्रधान नको असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे,” अशी टीका संजय राऊत यांनी काँग्रेसवर केली आहे.

काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये

“काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये. आला तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय निवडणूक लढवली जाईल. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे तर, त्या उंचीवर राहा. सांगलीतले आम्ही बघून घेऊ,” असा सूचक इशारा खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.

हे ही वाचा:

दादरच्या प्रकाश हॉटेलात स्मिथ, ब्रॉडने खाल्ले थालीपीठ, साबुदाणा वडा!

‘द केरळ स्टोरी’ प्रसारणाल विजयन यांचा विरोध

अरुण गवळी उर्फ डॅडीची तुरुंगातून सुटका होणार; मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश

काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध!

आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय

“इंडिया आघाडीमध्ये शिवसेना किंवा शरद पवार हे पंतप्रधान बनणार नाहीत काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार आहे. मग रुसवे फुगवे योग्य नाहीत. अन्य मतदारसंघ आम्ही जिंकत असून सुद्धा ते काँग्रेसला दिले आहेत तर सांगलीबाबत नाराजी असण्याचे कारण नाही. सांगली आणि भिवंडी मतदारसंघाचे विषय आता संपले आहेत. भिवंडीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून त्यांचा प्रचार करणार आहोत. तसे काँग्रेसने आमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन पाठिशी उभे राहायला हवे. आम्ही आता मैदानात उतरलो आहोत. आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय हे आमचे धोरण आहे, त्यानुसार शिवसेना आतापर्यंत वाटचाल करत आला आहे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा