संयुक्त राष्ट्राचे म्हणजेच यूएनचे महासचिव स्टीफन दुजारिक यांनी भारतातील निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात असे मत मांडले होते. यावरून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांना आणि स्टीफन यांना खडेबोल सुनावले आहेत. भारतातील निवडणुकांच्या निष्पक्षतेबद्दल कोणतीही काळजी करू नये, असं स्पष्ट मत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मांडले आहे.
भारतातील राजकीय अशांतता याबद्दल बोलताना यूएनचे महासचिव स्टीफन दुजारिक म्हणाले होते की, “आम्ही आशा करतो की भारतात, निवडणुका होत असलेल्या कोणत्याही देशात, राजकीय आणि नागरी हक्कांसह प्रत्येकाच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल आणि प्रत्येकजण मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करू शकेल.” यावरून एस जयशंकर यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
“आमच्या भारतातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष व्हाव्यात हे मला संयुक्त राष्ट्रांनी शिकवू नये. आमच्याकडे भारताचे लोक आहेत. निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होतील याची ते खात्री करतील. म्हणून, त्याची काळजी करू नका,” असे म्हणत जयशंकर यांनी दुजारिक यांना फटकारले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करत असल्याचा ‘द गार्डियन’चा भारतावर आरोप
भाजपच्या स्थापनादिनी एक लाखांहून अधिक लोक पक्षात सामील होणार!
अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर करून दाखवलं!
काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश
गेल्या आठवड्यात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे आणि विरोधी काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवल्यामुळे आगामी राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी भारतातील ‘राजकीय अशांतता’ बद्दल यूएनचे महासचिव स्टीफन दुजारिक यांना विचारण्यात आले होते. तेव्हा दुजारिक म्हणाले होते की, “आम्ही आशा करतो की भारतात, निवडणुका होत असलेल्या कोणत्याही देशात, राजकीय आणि नागरी हक्कांसह प्रत्येकाच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल आणि प्रत्येकजण मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करू शकेल.”