29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषमोदी सरकारच्या सॉवरेन गोल्‍ड बॉन्‍ड योजनेचा राहुल गांधींकडून लाभ

मोदी सरकारच्या सॉवरेन गोल्‍ड बॉन्‍ड योजनेचा राहुल गांधींकडून लाभ

योजनेत लाखोंची गुंतवणूक

Google News Follow

Related

काँग्रेस आणि पक्षाचे नेते हे केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका करत त्यांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी संपत्ती संदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यानुसार राहुल गांधी यांच्याकडे ९ कोटी २४ लाख ५९ हजार २६४ रुपये चल संपत्ती आहे. तसेच अचल संपत्ती सुमारे ११ कोटी १४ लाख २ हजार ५९८ रुपये आहे. दरम्यान, राहुल गांधी हे एकीकडे केंद्र सरकारच्या योजनांवर टीका करत असले तरी दुसरीकडे ते मोदी सरकारने सुरु केलेल्या योजनेचा भरभरून लाभ घेताना दिसत आहेत.

मोदी सरकारच्या सॉवरेन गोल्‍ड बॉन्‍ड योजनेत राहुल गांधी यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना सुरु केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (RBI) हे सोने विकले जाते. आठ वर्षांसाठी गुंतवणुकीची ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करताना पेपर सोने खरेदीसोबत वर्षाला २.५० टक्के व्याज मिळते. तसेच मुदतीनंतर सोन्याचे त्यावेळी असणाऱ्या दरानुसार रक्कम परत मिळते. या योजनेचा लाभ राहुल गांधी घेताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी या योजनेत १५.२७ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

तसेच राहुल गांधी यांच्या पीपीएफ खात्यात ६१.५२ लाख रुपये आहेत. तसेच राहुल गांधी यांनी म्युचुअल फंड आणि शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. राहुल गांधी यांच्याकडे ITC, ICICI बँक, अल्काइल एमाइन्स, एशियन पेंट्स, बजाज फाइनेंस, दीपक नाइट्राइट, डिवीज लॅबोरेटरीज, इन्फोसिस, टाटा कंसल्टेंसी सव्हिसेज (TCS), ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि टायटन कंपनीचे शेअर आहेत. शेअरमध्ये ४.३० कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

हे ही वाचा:

अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर करून दाखवलं!

काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!

मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा

सॉवरेन गोल्ड बॉन्ड काय आहे?

केंद्र सरकारनं २०१५ मध्ये सॉवरेन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. ही सोन्याची खरेदी एक गुंतवणूक आहे, ज्यावर व्याज मिळते. केंद्र सरकार वेळोवेळी सर्वसामान्यांना या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी देते. या अंतर्गत १ ग्रॅम ते ४ किलोपर्यंत सोनं खरेदी करू शकता. त्याची किंमत रिझर्व्ह बँक ठरवते. हे सोने बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), एनएसई आणि बीएसईसारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजमधून खरेदी केले जाऊ शकतं.

हे बॉन्ड आठ वर्षांच्या कालावधीसाठी असतात. दरम्यान, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या वर्षांत यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सरकारनं गुंतवणुकीवर २.५० टक्के वार्षिक व्याज निश्चित केलं आहे. व्याज अर्धवार्षिक अंतरानं दिलं जातं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा