32 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरराजकारणराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून दुसरी यादी जाहीर!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून दुसरी यादी जाहीर!

पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध बजरंग सोनवणे रिंगणात

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीमध्ये दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीतून सुरेश उर्फ ​​बाळामामा म्हात्रे यांना तिकीट देण्यात आले आहे.

बजरंग सोनवणे यांनी नुकताच अजित पवार यांच्या गटाला जोरदार धक्का देत शरद पवार यांच्याशी हातमिळवणी केली होती.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.या मतदार संघातून भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या मतदार संघातून लढत रोचक होणार आहे.दरम्यान, बीडमध्ये ज्योती मेटे यांच्या उमेदवारीच चर्चा सुरू होती. मात्र, या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली.

“संदेशखालीच्या गुन्हेगारांना त्यांचं संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावं लागेल”

अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर करून दाखवलं!

सुरजेवाला यांच्याविरोधात भाजपा आक्रमक

महंत अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर मुस्लीम समुदायाकडून हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून भिवंडीच्या जागेवर सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये भिवंडीच्या जागेवरून मोठे मतभेद निर्माण झाले होते.मात्र आता या जागेचा तिढा सुटला असून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.पहिल्या यादीमध्ये पाच उमेवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.पहिल्या यादीत शिरूरमधून अमोल कोल्हे, बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि नगर दक्षिणमधून निलेश लंके लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.तसेच
वर्धामधून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा