‘अखिल भारतीय संत समिति, धर्म समाज’चे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पिठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवार, ३ एप्रिल रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुस्लिम समाजाच्या जमावाने नाशिक हायवेजवळ हल्ला करून त्यांच्या गाडीचे नुकसान केले. अनिकेतशास्त्री महाराज यांनी यासंदर्भात नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून राज्य शासनाकडे पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
अनिकेतशास्त्री महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईहून नाशिकला जात असताना उपनगर ते दत्तमंदिर हायवेदरम्यान मुस्लीम समाजातील काही लोकांगी रस्त्यावर उतरून गाड्यांची तोडफोड केली. त्याचप्रमाणे माझ्याही गाडीवर त्यांनी हल्ला केला. गाडीवर लाथा-बुक्क्या आणि काठ्या मारल्या. यात गाडीच्या काचेचे नुकसान झाले. दरम्यान, गाडी एका गल्लीतून बाहेर काढून आम्ही आमचा जीव वाचवला,” असं ते म्हणाले. या ठिकाणी जवळपास ९०० ते १००० चा जमाव असल्याचे महाराजांनी सांगितले.
विशेष म्हणजे हा त्यांच्यावर झालेला चौथा हल्ला असल्याचा दावा अनिकेतशास्त्री महाराज यांनी केला आहे. “हा आमच्यावर झालेला चौथा प्राणघातक हल्ला होता. गेल्या काही महिन्यांपासून अनोळखी इसमांकडून आश्रमावर दगडफेक, गोशाळेवर दारूच्या बाटल्या फेकणे तसेच वारंवार गाडीवर दगडफेक करण्याचे प्रकार करण्यात येत आहेत,” असे अनिकेतशास्त्री महाराज यांनी सांगितले. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्य शासनाने मला आणि माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी अनिकेतशास्त्री महाराज यांनी केली आहे. तसेच नाशकतील संतांची सुरक्षा ऐरणीवर असून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश
सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!
मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा
संजय निरुपम यांनी केलं स्पष्ट; आधी राजीनामा नंतर हकालपट्टी
पालघर साधू हत्याकांडसारखाच प्रकार नाशिकरोड येथे करण्याचा प्रयत्न झाल्याची भीती अनिकेतशास्त्री महाराज यांनी व्यक्त केली आहे. चार वर्षांपूर्वी २०२० मधील एप्रिल महिन्यात पालघर येथे जमावाकडून झालेल्या मारहाणीत दोन साधू यांच्यासह अन्य तिघांचा प्राण गेला होता.