छत्तीसगडच्या विजापूरमध्ये आठ तास चाललेल्या सुरक्षा चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांची संख्या १३ झाली असून बुधवारी (३ एप्रिल) सकाळी जवानांनी आणखी तीन मृतदेह बाहेर काढले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लेंडा गावातील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना मंगळवारी सकाळी ६ वाजता ही चकमक झाली.अलिकडच्या वर्षांत हे सर्वात मोठे सुरक्षा ऑपरेशन मानले जात आहे.बुधवारी सकाळपर्यंत जवानांनी एकूण १३ मृतदेह बाहेर काढले आहेत.
हे ही वाचा:
‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले
यूपी पोलीस पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात!
तिबेट क्षेत्राला ६० भौगोलिक नावे जाहीर करा
सुशील कुमार मोदी कॅन्सरने ग्रस्त!
जिल्हा राखीव रक्षक, विशेष टास्क फोर्स, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ऍक्शन (कोब्रा ) यांच्या संयुक्त शोधमोहीमेत ही कारवाई करण्यात आली.या जंगल परिसरात वरिष्ठ माओवादी पापा राव हा उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली.या माहितीच्या आधारे सुरक्षा अधिकाऱ्यांनी मंगळवारी (२ एप्रिल) परिसरात शोधमोहीम राबविली. विजापूर जिल्हा बस्तर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो.१९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान, विजापूरच्या बासागुडा भागात २७ मार्च रोजी झालेल्या चकमकीत सहा माओवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर एका आठवड्यानंतर ही सुरक्षा चकमक घडली.या वर्षात आतापर्यंत बस्तरमध्ये सुरक्षा चकमकीत किमान ४३ माओवादी ठार झाले आहेत.