देशातून कॉंग्रेसचा सफाया करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपुर शहरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतातील जनतेने भाजपला तिसऱ्यादा मतदान केले तर देश जळून जाईल असे वक्तव्य केले होते. याचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ६० वर्ष सत्तेत असलेले लोक केवळ १० वर्ष सत्तेशिवाय राहून देश पेटवण्याची भाषा करत आहेत. मतदारांनी या देशातून कॉंग्रेसला पुसून टाकावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा..
सुनीता केजरीवाल होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री?
‘इंडी’ गटात सावळा गोंधळ; जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीच्या बालेकिल्ल्यातून नॅशनल कॉन्फरन्सचा उमेदवार
पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ४३ लाख रुपयांचे बक्षीस असणारे दोन नक्षलवादी ठार!
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी दिले आव्हान, ‘आधी त्या भारतीय साड्या पेटवा!’
पंतप्रधान मोदी म्हणाले, देश पेटवण्याची भाषा तुम्ही स्वीकारू शकता का ? या देशाला पेटू देणार का ? अशी भाषा वापरणे योग्य आहे का ? लोकशाही देशात ही भाषा मान्य आहे का ? असे सवाल पंतप्रधान मोदी यांनी मतदारांना केले. याशिवाय अशा लोकांना शिक्षा करणार का ? चुन चुन के साफ करो (त्यांना वैयक्तिकरित्या पुसून टाका). यावेळी त्यांना रणांगणात लढू देऊ नका, असे आवहान सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.