‘बुक माय शो’ या वेबसाईटची हुबेहूब बनावट वेबसाईट तयार करून ‘आयपीएल टी-२०’ ची बनावट तिकिटांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने छडा लावला लावून गुजरात राज्यातून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
ही बनावट वेबसाईट सौदी अरेबियातील अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने डिझाइन करून घेतले होते आणि या वेबसाईटचे सर्व्हर हाँगकाँगमध्ये होते अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.
खुशाल रमेशभाई डोबरिया (२४), भार्गव किशोरभाई बोर्ड (२२), वेब डेव्हलपर उत्तम मनसुखभाई भिमानी (२१), मोबाइल ॲप डेव्हलपर जस्मिन गिरधरभाई पिठाणी (२२), हिम्मत रमेशभाई अंताला (३५), निकुंज भूपतभाई खिमानी, अरविंदभाई चोटालिया (२५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी हे सर्व गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी आहे. ‘आयपीएल टी-२०’सिझन २०२४ क्रिकेट सामने सुरू आहे. या सामन्याचे तिकीटांचा ऑनलाईन विक्रीचे हक्क ‘बुक माय शो डॉट कॉम’ या वेबसाईटला देण्यात आलेले आहेत.
हे ही वाचा:
श्री ४२० तिहारमध्ये रामलीला मैदानावरील कीर्तन अगदीच वाया…
तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती
मुंबई गुटखामुक्त करा, काँग्रेस नेते राजेश शर्मांची मागणी!
क्रिकेट प्रेमींनी बुक केलेले आयपीएल क्रिकेट सामन्याचे तिकिटे बोगस असल्याच्या तक्रारी ‘बुक माय शो डॉट कॉम’ या वेबसाईटवर येऊ लागल्यानंतर वेबसाईटने तिकिटांची खात्री केली असता बुक माय शो नावाने ‘बुक माय शो डॉट क्लाउड /स्पोर्ट ही हुबेहूब बनावट वेबसाईट तयार करून या वेबसाईटवर आयपीएल टी२० ची बनावट तिकिटे विक्री केली जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या सीआययु च्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करून सुरत येथून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
ही बनावट वेबसाइट सौदी येथून डिझाइन करण्यात आली असून या वेबसाईटचे सर्व्हर हॉंगकॉंग येथे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच या वेबसाईटवरून संपूर्ण देशभरात बनावट तिकिटांची विक्री करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.