मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी रात्री आपल्या शैलीत फेसबूक लाईव्ह करून १४ एप्रिलपासून संपूर्ण संचारबंदी लागू केली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध घटकांसाठी मदत घोषित करताना मोठी चूक केली, ज्यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली होती. आज अतुल भातखळकरांनी पुन्हा एकदा ट्वीट करत मुख्यमंत्र्यांची चूक दुरूस्त करून दाखवली आहे.
हे ही वाचा:
गुजरात एटीएस, तटरक्षक दलाची दमदार कामगिरी
मुंबई महानगरपालिकेकडून पंचतारांकित हॉटेलच्या वापराला सुरूवात
कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या
देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन
काय नेमके घडले?
मुख्यमंत्र्यांनी मदतीच्या घोषणा करताना अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी ७ कोटी असल्याचे सांगितले. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी असताना त्यातले अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी ७ कोटी असल्याचा हास्यास्पद दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यावेळेला भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीटरवरून लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते,
महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी. त्यातील अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी 7 कोटी? एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा? मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा विचार आणि बोलण्यापूर्वी थोडा अभ्यास केलात तर बरं होईल.
महाराष्ट्रात अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी सुमारे 66 लाख आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढेही ठाऊक नसावे? बर आपल्याला अर्थ संकल्पापासून अन्न सुरक्षा योजनेपर्यंत काहीच माहिती नसते, पण कळत नाही तर विचारा तरी कोणाला.आजूबाजूला सगळेच कम्पाउंडर, विचारणार तरी कोणाला? https://t.co/BYGB3ZCspX
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 15, 2021
त्यानंतर आज अतुल भातखळकरांनी या योजनेत नेमके किती लाभार्थी आहेत ती संख्या देखील सांगितली आहे. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आणि त्या निमित्ताने संपूर्ण ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे,
महाराष्ट्रात अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी सुमारे 66 लाख आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढेही ठाऊक नसावे? बर आपल्याला अर्थ संकल्पापासून अन्न सुरक्षा योजनेपर्यंत काहीच माहिती नसते, पण कळत नाही तर विचारा तरी कोणाला.आजूबाजूला सगळेच कम्पाउंडर, विचारणार तरी कोणाला?
एकूण मुख्यंमंत्र्यांच्या कारभाराचे वाभाडे अतुल भातखळकर यांनी दोन ट्वीट करून काढले आहेत.