आयपीएल २०२४ चा लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज मयांक यादवने पदार्पणात क्रिकेटजगताचे लक्ष आपल्यावर केंद्रीत केले आहे. मयांकने पदार्पणाच्या सामन्यात ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. ब्रेट ली, इयान बिशप आणि डेल स्टेन यांनीही मयांकचे भरभरून कौतुक केले आहे. आता या अनुभवी खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचा माजी खेळाडू रशीद लतीफचे ही नाव जोडले गेले आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मयंकने ताशी १५५.८ किमी वेगाने सर्वात जलद चेंडू टाकला. त्याचा वेग, अचूक लाईन आणि लेंथने सर्व क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.
पाकिस्तानचा माजी कर्णधार रशिद लतीफ यांनी मयांकचे तोंड भरून कौतुक केले आहे. रशीक म्हणाला, मयांकची अॅक्शन आश्चर्यकारक आहे आणि ताशी १५५ किमीचा वेग हा काही येडा गबाल्याचे काम नाही. मयांकने थोडे फिटनेसकडे लक्ष दिले तर याला रोखणे कठीण आहे. त्याच्याकडे वेग, अचूकता आणि धोकादायक बाऊन्सरदेखील आहेत. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध शॉर्ट बॉल टाकून पंजाबच्या फलंदाजांसाठी अडचणी निर्माण केल्या होत्या.
त्यात भर म्हणजे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली म्हणाला, तो स्टार आहे. त्यांना यॉर्कर चेंडूवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. परंतु पुढील वर्षभरात तो पूर्णपणे त्यासाठी तयार असेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो त्याच्या खांद्याचा वापर करतो. नवा स्टार मिळाल्याबद्दल भारताचे अभिनंदन. त्याचा वेग अजूनही वाढू शकतो, हे त्याच्या अक्शमधून दिसून येते. त्याच्यावर मेहनत घेऊन तो सक्षम बनेल तेव्हा तो जगातील फलंदाजांना रडवेल, यात शंका नाही.
हेही वाचा :
ओवैसींना आला मुख्तार अन्सारीचा उमाळा
अडवाणींना भारतरत्न प्रदान करताना पंतप्रधान मोदी यांनी केले प्रोटोकॉलचे पालन
‘तेल्याचा मुलगा मंदिराचे उद्घाटन कसे करू शकतो?’
पदार्पणाच्या सामन्यात मयंक यादवची शानदार कामगिरी
आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात मयांक यादवने पहिल्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोला वेगाने चकवा दिला. त्याने शिखर धवनला वेगाच्या जोरावर अडचणीत आणले होते. मयंकने ४ षटकांत केवळ २७ धावा देत ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. किंबहुना त्याने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सामना लखनऊ सुपर जायंट्सकडे वळवला होता.