प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा आज (१ एप्रिल) भगवान रामाच्या नगरी अयोध्येत पोहोचले आहेत.अनुप जलोटा यांनी प्रभू रामाचे दर्शन घेऊन पूजा केली.अयोध्येला पोहोचलेले अनुप जलोटा म्हणाले की, त्यांच्यासोबत जगातील विविध देशांतून ४५ लोक आले होते, जे रामललाच्या दर्शनासाठी अनेक दिवसांपासून फोन करत होते.हे सर्व लोक रामललाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत, ज्यात प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, थायलंडसह अनेक देशांतील लोकांचा समावेश आहे.
अयोध्येत पोहोचलेल्या अनुप जलोटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या आणि देशाच्या विकासासाठी केलेल्या कामाचे कौतुक करत त्यांना राम-लक्ष्मणाची जोडी म्हटले. ते पुढे म्हणाले की, देशातील निम्मी लोकसंख्या मोफत रेशनचा लाभ घेत आहे. चांगली व्यवस्था असेल तर आगामी निवडणुकीत मोदी सरकार ४०० चा टप्पा पार करेल हे निश्चित आहे.
हे ही वाचा:
हिंदू रिक्षा चालकावर जमावाचा हल्ला
अरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी
‘मॉस्को हल्ल्याशी संबंध असल्याचा रशियाचा आरोप धादांत खोटा’
मविआमध्ये एकोपा नाही; प्रकाश आंबेडकरांचा घाणाघात
आता ताजमहाल नाही तर भारतात येणाऱ्यांची पहिली पसंती अयोध्या
अनूप जलोटा म्हणाले की, पूर्वी जेव्हा लोक भारतात यायचे तेव्हा त्यांची पहिली पसंती ताजमहाल होती. आता तसे नाहीये.आता बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रथमतः अयोध्येत यायचे आहे.त्यानंतर काशी विश्वनाथ आणि तिसरं म्हणजे ताजमहाल.हेच व्हायला पाहिजे होते, तेच झाले.
मुस्लिमही भाजपला मतदान करतील
अनूप जलोटा पुढे म्हणाले, देशात जेव्हा चांगला विकास होईल आणि चांगल्या सोयी-सुविधा असतील, तेव्हा त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर दिसून येईल. भाजपला मत देणारे अनेक मुस्लिम आहेत. मुस्लीम समाजाचे लोकही भाजपच्या समर्थनात उतरतील, मग काय उरणार?, असे अनूप जलोटा म्हणाले.